आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारताचा आर्थिक विकास मंदावला आहे, मात्र हा आताही जी-२० देशांत सर्वात वेगवान असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने सोमवारी दिली. मंत्रालयानुसार, २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर(५ लाख कोटी डॉलर)ची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट प्राप्त केले जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केरळचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी नमूद केले की, आर्थिक मरगळ असतानाही जागतिक आर्थिक अहवालात भारतीय अर्थव्यवस्था २०१९-२० मध्ये जी-२० देशांत वेगवान वाढ करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सरकार देशात मुदत गुंतवणुकीच्या सामान्य स्तरावरील समस्या दूर करण्याचे उपाय योजत आहे. गुंतवणूक कमी झाल्यामुळे निर्यातीवरही परिणाम पडला आहे. सरकार यामध्ये सुधारणा अाणत आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीही अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर सरकारचा बचाव केला. आम आदमी पार्टीचे नेते भगवंतसिंग मान यांच्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी नोटबंदीच्या निर्णयाचा बचावही केला. त्यांनी सांगितले की, नोटबंदीमुळे देशात करदात्यांची संख्या वाढली आहे. ठाकूर म्हणाले, ५% ची वाढ कोणती मंदी नाही. २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्टही साध्य केले जाईल.
अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार सर्व पक्षांशी चर्चा करतेय
अर्थमंत्र्यांनी निवेदनात सांगितले की, अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठी पाऊल उचलता यावे यासाठी सर्व स्टेकहोल्डर्सशी चर्चा केली जात आहे. सुधारणांच्या माध्यमातून महागाईवर नियंत्रण आले. महसुली खर्चाला शिस्त आणली आणि आणि चालू तूटचे व्यवस्थापन करण्यालायक स्तरावर ठेवले आहे. यामध्ये मायक्रोइकॉनाॅमिक्स स्थिती निश्चित होईल आणि देशात गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण बनेल. अर्थमंत्री म्हणाले, देशात मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी कंपनी कर दर १५% केले आहे.
२८ कंपन्यांत भागीदारी विकण्याची योजना
मंत्रिमंडळाने एअर इंडियासह २८ सरकारी कंपन्यांमध्ये धोरणात्मक भागीदारी विकण्यास सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली. सरकारने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १७,३६४ कोटी रु. जमा केले आहेत. मार्चपर्यंत १.०५ लाख कोटी रु. जमा करण्याचे उद्दिष्ट आहे.
एअर इंडिया, आयटीडीसी हॉटेल्स, पवन हन्ससह अनेक कंपन्यांचा यादीत समावेश
एअर इंडिया, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, अँड्रयू युले अँड कंपनी, आयटीडीसी अशोक हॉटेल, बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट अँड बामर लाँरी अँड कंपनी, एमटीएनएल, कन्सलटंट इंडिया, नॅशनल टेक्सटाइल कॉर्पाेरेशन, एफसीआय अरावली जिप्सम अँड मिनरल्स इंडिया, हिंदुस्तान कॉपर, मेकॉन, ब्रेथवेट अँड कंपनी, बीपीसीएल, भारत इम्युनोलॉजिकल अँड अॅल्युमिनियम कंपनी, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन, स्कूटर्स इंडिया, सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेड, प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया, ब्रिज अँड रुफ कंपनी, इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स इंडिया, हिंदुस्तान न्यूजप्रिंट लिमिटेड, सिमेंट कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया, हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सल्टन्सी कॉर्पाेरेशन, पवन हंस, नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पाेरेशन, आयटीडीसी हॉटेल्स.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.