आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - वेगवान गाेलंदाज शमीने यजमान भारतीय संघाच्या घरच्या मैदानावरील बांगलादेशविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यातील विजयामध्ये माेलाचे याेगदान दिले. या कसाेटीमध्ये त्याची (७ विकेट) गाेेलंदाजी लक्षवेधी ठरली. याच्या बळावर त्याने आयसीसीच्या कसाेटी क्रमवारीमध्ये माेठी प्रगती साधली. त्याला कसाेटी सामन्यातील अव्वल गाेलंदाजीचा क्रमवारीत माेठा फायदा झाला. यातून त्याने क्रमवारीत करिअरमधील सर्वाेत्तम सातवे स्थान गाठले. त्याने सलामीच्या कसाेटीत सात विकेट घेतल्या. आयसीसीने रविवारी कसाेटी क्रमवारी जाहीर केली. याच्या टाॅप-१० मध्ये नऊ हे वेगवान गाेलंदाज आहेत. यामध्ये एकमेव फिरकीपटू अश्विन हा दहाव्या स्थानावर आहे.
भारताच्या वेगवान गाेलंदाजांचा यंदाच्या सत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. या गाेलंदाजांनी सत्रातील सात सामन्यात ३३.७ च्या स्ट्राइक रेटने ७६ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच या गाेलंदाजांनी प्रत्येक ३४ व्या चेंडूवर विकेट घेतल्या आहेत.
८७ वर्षांच्या कसाेटी इतिहासात भारतीय वेगवान गाेलंदाजांचा स्ट्राइक रेट सर्वाेत्तम राहिला आहे. कसाेटीला १८७७ मध्ये सुरुवात झाली. मात्र, भारताने १९३२ मध्ये पहिला कसाेटी सामना खेळला हाेता.
जगात वेगवान गाेलंदाजांच्या स्ट्राइक रेटमध्ये वाढ
२०१९ मध्ये जगात सर्वच संघाच्या वेगवान गाेलंदाजांच्या कामगिरीचा दर्जा उंचावत आहे. यांचा स्ट्राइक रेट ४८.४ नाेंद आहे. ११३ वर्षातील सर्वाेत्तम कामगिरी ठरली आहे. १९१३ मध्ये वेगवान गाेलंदाजांनी २ सामन्यात ४७.३ च्या सरासरीने ४४ बळी घेतले हाेते. २०१९ मध्ये वेगवान गाेलंदाजांनी २८ सामन्यात ४८.४ च्या सरासरीने ६१८ बळी घेतले. कसाेटीच्या इतिहासात सर्वाेत्तम स्ट्राइक रेट १८८८ मध्ये नाेंद झाला हाेता. ४ सामन्यात वेगवान गाेलंदाजांनी ३१.२ च्या सरासरीने ६८ बळी घेतले.
मयंक करिअरमध्ये सर्वाेत्तम ११ व्या स्थानावर
सलामीला द्विशतक साजरे करणारा मयंक हा फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये चमकला. त्याने करिअरमधील सर्वाेत्तम स्थानावर धडक मारली. ताे आता ११ व्या स्थानावर दाखल झाला. काेहली हा दुसऱ्या, पुजारा चाैथ्या, रहाणे पाचव्या स्थानी कायम आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.