आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे ट्रॅकवर धावली देशातील पहिली High Speed Train, पकडला होता 180 किमी प्रति तासाचा वेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली : भारतातील सर्वात जलद गतीने धावणाऱ्या रेल्वेचा व्हिडियो समोर आला आहे. यामध्ये रेल्वे 180 KMPH ची स्पीडने धावत असल्याचे दिसत आहे. रेल्वेच्या लोको पायलटने हा व्हिडियो शूट केला आहे. व्हिडियोमध्ये स्पीडो मीटर दाखवण्यात आला आहे. यामध्ये स्पीड काटा 180 KMPH वर पोहोचलेला दिसत आहे. केंद्रीय   रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवर व्हिडियो शेअर करत या रेल्वेला भारतातील सर्वात वेगवाग रेल्वे सांगितले आहे. या रेल्वेचा दिल्ली ते आग्रा दरम्यान नुकताच तिसरा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडला होता. यादरम्यान रेल्वे 18 ने दिल्ली ते आग्रा दरम्यानचे 200 किमी अंतर फकत् 108 मिनिटात पार केले होते. यावेळी रेल्वेचा सरासरी वेग 120 किमी प्रति तास होता. 

बातम्या आणखी आहेत...