आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाबमध्ये देशातील पहिली चालकाविना बस : ही इको फ्रेंडली आहे व अपघाताचा धोका नाही, 15 आसनी, 70 किमी चालते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फगवाडा- पंजाबमध्ये सुरू असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये देशातील पहिली चालकाविना बस तयार करण्यात आली आहे. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू)चे २५० विद्यार्थी व ५ फॅकल्टीच्या पथकास ही बस बांधण्यात एक वर्षाचा कालावधी लागला. बसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इमेज प्रोसेसिंग व सेन्सर आहेत. याच्या मदतीने रस्त्यात एखादा अडथळा आल्यास स्वत:च ब्रेक लावेल ही संपूर्णत: इको-फ्रेंडली आहे. या बसला अपघात होण्याची शक्यता नाही, असा दावा एलपीयूच्या प्राध्यापकांनी केला आहे. या बसला चालवण्यासाठी मोबाइल अॅप आहे. मात्र, १०किमी परिघात ब्ल्यूटूथने यास आदेश देता येऊ शकतात.

 

सौरऊर्जेवर चालणारी चालकाविना बस प्रकल्पाचे प्रमुख मनजितसिंग यांनी सांगितले, एकदा चार्ज झाल्यावर ही बस ७० किमीपर्यंत चालते. या बसमधून एका वेळी १५ प्रवासी प्रवास करू शकतील. याचा वेग ताशी ३० किमी इतका आहे. याची बांधणी करण्यासाठी ६ लाख रुपये खर्च आला. बाजारात याची किंमत १५ ते २० लाख रुपये ठेवता येईल. 

 

बसला चोहोबाजूने सेन्सर व कॅमेरे आहेत बसवलेले 
प्रोजेक्ट लीडर मनजितससिंग यांनी सांगितले, ही बस विद्यापीठ कॅम्पस, रुग्णालय, विमानतळ व स्मार्टसिटीच्या हाउसिंग सोसायटीतील वाहतूक लक्षात घेऊनच तयार करण्यात आली आहे. ए. आय. यंत्रणा विकसित करण्यास जास्त कालावधी लागला. या बसने अपघात करू नयेत म्हणून यात बरेच इनपुट देण्यात आले आहेत. बसवर कॅमेरा व समोर, मागे व दोन्ही बाजूला सेन्सर आहेत. बसच्या मार्गात जर काही अडथळा आला तर १० मीटर दुरूनच आवाज येईल व ५ मीटरवर ब्रेक लागतील.