आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालासिनाेरमध्ये उभा राहताेय देशातील पहिला डायनासाॅर पार्क; पर्यटकांना मिळणार महाकाय प्राण्याची खडान‌्खडा माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालासिनोर - बालासिनाेरमधील डायनासाॅर आणि फाॅलिस पार्क पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. जगातील तिसरा सर्वात माेठा आणि देशातील पहिला डायनासाॅर आणि फाॅलीस पार्क लवकरच सामान्य जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. गुजरातचे पर्यटन  मंत्री जवाहर चाेपडा यांनी अलीकडेच या पार्कचा दाैरा केला. गुजरातच्या पर्यटन विभागाने बालासिनाेरमध्ये ५२ हेक्टर जागेवर हा पार्क उभारला आहे. आजपासून ३६ वर्षांपूर्वी याच ठिकाणी डायनासाॅरचे जीवाश्म आढळून आले हाेते. महाकाय डायनासाॅरचा जवळपास ६५ दशलक्ष वर्षांचा इितहास समाेर आणण्यासाठी देशातील हे पहिले आधुनिक म्युझियम तयार करण्यात आले आहे. डायनासाॅरचे राहणे, खाद्य तसेच त्यांच्या जीवनाशी निगडीत सर्व माहिती या म्युझियममध्ये असेल. 


डायनासाॅरच्या सात प्रजाती येथे राहायच्या
बालासिनोरपासून ११ किलाेमीटरवरचे रैयाेली गाव अश्मीभूत अवशेष अभ्यासकांसाठी अनेक वर्ष आकर्षण ठरले आहे. अभ्यासकांच्यामते  येथे डायनासाॅरच्या जवळपास ७ जाती राहत हाेत्या. डायनासाॅरच्या १० हजार अंड्यांचे अवशेष येथे सापडले हाेते.  हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याने येथे इतक्या माेठ्या संख्येने अंड्यांचे अवशेष सापडले. डायनासाॅरचे जगातील तिसरे सर्वात माेठे जीवाश्म स्थान म्हणूनही हे ठिकाण आेळखल्या जाते. २००३ मध्ये  खाेदकामात काही नवीन जातीही येथे सापडल्या हाेत्या. डायनासाॅरची हाडे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर सापडली हाेती. २००३ मध्ये सापडलेल्या सापळ्यात मुख्यत्वे डाेके, कंबर, पाय, पाठीचा कणा आणि शेपटीच्या काही हाडे हाेती.

 

हा आहे इतिहास, मराठा आणि इंग्रजांची हाेती सत्ता
स्वातंत्र्यापूर्वी बालासिनाेर राज्य नावाने आेळखले जायचे. येथे बाबी वंशाच्या प्रशासकांचे राज्य हाेते. त्या आधी मराठा आणि इंग्रजांची सत्ता हाेती. अहमदाबादपासून ९० किलाेमीटर अंतरावर असलेल्या या बालासिनाेरच्या रेयाैली गावात २००३मध्ये पहिल्यांदा खाेदकाम झाले. त्यानंतर पुरातत्व विभागाने अनेकवेळा खाेदकाम केले त्यावेळी येथे डायनासाॅरचे जीवश्म  येथे आढळले  होते.


पार्कमध्ये ५ डी थिएटर, थ्रीडी फिल्मसह असतील अनेक सुविधा
टाईम मशिनमध्ये जगभरातील तसेच गुजरातमधील विविध डायनासाॅरचे अवशेेष दाखविण्यात येतील. या मध्ये अलीया सुल्तान बाबींच्या संग्रहालयात सापडलेली जीवाश्म अंडी आणि हाडे असतील. ५डी थिएटर, थ्रीडी फिल्म, मध्यजीवीय काळातील हुबेहुब अनुभव,संग्रहालय, अल्पाेपहार गृह, शाैचालय, पिण्याचे पाणी  आदी विविध सुविधा असतील. त्या शिवाय डायनासाॅर सादरीकरण , म्युझियमनुसार आकर्षक प्रवेशद्वार, पृथ्वीच्या उत्क्रांतीचे डिजिटल सादरीकरण, डिजिटल डिस्प्ले, वाॅल आर्ट, राजा साैरस डायनासाॅरची प्रतिकृती आदी गाेष्टी पहायला मिळतील.

बातम्या आणखी आहेत...