आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅम्बोर्गिनी नाही तर ही आहे मारुतीची बलेनो कार.. मॉडिफाय केल्यानंतर दिसते काहीशी अशी.. तर मायलेज आहे 27 km हून अधिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - कारमध्ये फेरबदल करणारी कंपनी 360  Motoring Kollam ने मारुती सुझुकी बलेनोची फेररचना केली आहे. फेरबदलानंतर या कारचे स्वरूप अगदी लॅम्बोर्गिनी सारखेच दिसते. या कारमध्ये सिजर डोअर देखील लॅम्बोर्गिनी सारखेच लावले गेले आहे.केरळच्या कुट्टीवट्टम जिल्ह्यातील करुणगापल्ली येथे या कंपनीचे मोठे शोरूम देखील आहे. भारतात अल्टो गाडीनंतर बलेनो या गाडीलाच  सर्वाधिक मागणी आहे.

 

या गोष्टींमध्ये करण्यात आले फेरबदल...
>बलेनो या गाडीला समोर नवीन ग्रिल्स आणि बम्पर लावण्यात आले आहेत. बम्पर खालील बाजूस एलईडी लाइट आणि काळे स्प्लिटर देखील लावले आहेत.
>17- इंच  मार्केट रिम्स लावले आहे.आणि कारचा ग्राउंड क्लिअरन्स देखील कमी करण्यात आला आहे.
>गाडीच्या वरील बाजूस ग्लॉस wrapping केलेले आहे.
> कंपनीने अद्याप या गाडीमध्ये फेरबदल करण्यासाठी किती खर्च लागला याविषयी माहिती दिलेली नाही.
>कार इंजिन आणि इंधन टाकी क्षमतेमध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत.

 

मजबूत मायलेज 
> मारुतीची ही कार नेक्सा कंपनीने डिझाइन केलेली आहे. जवळपास ही कंपनी मारुतीच्या सर्वच प्रिमियम कार डिझाइन करत असते.  
> कंपनीने या कारला पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. पेट्रोल कार मध्ये 1197 cc तर,  डिझेलमध्ये 1248 cc असे त्याचे इंजिन आहे.
> कंपनीने असा दावा केला आहे की, पेट्रोल इंजिन २१.४ KMPL  तर, डिझेल इंजिन २७. ३९ KMPL एवढे मायलेज देते.   
> दोन्ही व्हेरिएंट मध्ये इंधन टाकी ३७ लिटरच आहे. तर इंजिन ४ सिलेंडरचे आहे.

 

स्टाइलिश इंटिरिअर
> या कॉम्पॅक्ट SUV मध्ये पायांसाठी आरामदायी अंतर ठेवण्यात आले आहे तसेच, आतील बाजूस लेदर फिनिशिंग देखील दिले आहे .
> याकार मध्ये 7 inch इन्फोटेनमेंट प्रणाली आहे. ती ऍपलच्या 'कार प्ले' टेक्नॉलॉजीसह येते.
> कारमध्ये Adjustable स्टीयरिंग, ऑटो एसी, ऑटो ड्राइव्ह मोड, पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग, नवीन डिजिटल स्पीडो मीटर देखील मिळते.
> बलेनोला मॅन्युअल गिअर बॉक्ससह एम टी मॉडेलमध्ये देखील लॉन्च केले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...