आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमध्ये देशातील पहिले गार्बेज कॅफे; १ किलो प्लास्टिक आणून दिल्यास पाेटभर जेवण, अर्धा किलोवर नाष्टा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबिकापूर - छत्तीसगडच्या अंबिकापूर पालिकेने देशातील पहिले गार्बेज कॅफे सुरू केले आहे. या कॅफेमध्ये एक किलो प्लास्टिकचा कचरा आणून दिल्यास पाेटभर जेवण व अर्धा किलोवर नाश्ता देण्यात येताे. याबाबत माहिती देताना अंबिकापूरचे महापाैर अजय तिर्की यांनी सांगितले की, जे नागरिक आमच्याकडे १ किलो प्लास्टिक आणून देतील, त्यांना आम्ही भाेजन देतआअाहाेत. शहर स्वच्छतेसाठी हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यातून स्वच्छतेला प्राेत्साहन मिळेल व नागरिकांना स्वच्छतेची सवय लागेल. जमा झालेले प्लास्टिक रस्तेनिर्मितीसाठी वापरले जाणार आहे. या उपक्रमासाठी ५ लाखांची तरतूद केली असून, यातून गरिबांसह रस्त्यांवर राहणाऱ्यांचा फायदा हाेईल, असेही त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...