Home | Business | Gadget | India's first modular design air cooler with aerofan high speed technology

56 फुटांपर्यंत हवा फेकतो हा कुलर, इतका पावरफुल की 15 डिग्रीपर्यंत कमी करतो रूमचे तापमान; पार्ट्स जोडून फक्त 5 मिनिटात होतो तयार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 31, 2019, 01:51 PM IST

उंची कमी जास्त करण्यासाठी कुलरसोबत येते ट्रॉली, इतकी आहे किंमत

 • India's first modular design air cooler with aerofan high speed technology

  गॅझेट डेस्क - ओरियंट कंपनीने Desert Storm मॉड्यूलर कूलर आणला आहे. हा भारतातील पहिला मॉड्यूलर कुलर असल्याचे कंपनीने म्हणणे आहे. याला फक्त 5 मिनिटात असेंबल करता येते. तसेच याचा वापर झाल्यावर याला दोन लहान डब्ब्यात पॅक करता येते.


  स्वतः करू शकतात असेंबल

  या कुलरचे वैशिष्ट्य आहे की, हा कुलर दोन लहान डब्ब्यात येतो. एका डब्ब्यात कुलरचे तीन पॅड असतात. तर दुसऱ्या डब्ब्यात फॅन आणि वॉटर टँक. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नट-बोल्ट मिळत नाहीत. सर्व पार्ट फिक्स करण्यासाठी लॉक देण्यात आले आहेत. उन्हाळा संपल्यानंतर तुम्ही याला पुन्हा पॅक करू शकतात.


  नवीन तंत्रज्ञान असलेले ब्लेड्स

  या कुलरमध्ये जास्त गतीने हवा फेकण्यासाठी एरोफॅन तंत्रज्ञान असलेले हाय अँगल फॅन ब्लेड्स देण्यात आले आहे. याचे डिझाइन इतर कुलरपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. याचा ब्लेडचा आवाज कमी येतो आणि 56 फुटांपर्यंत हवा फेकू शकतात. कुलरमध्ये डेंसनेस्ट फीचरचे हनीकॉम्ब पॅड दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की, हे पॅड 45% जास्त पाणी शोषून घेतात त्यामुळे कुलर 25% जास्त थंड हवा देतो. या कुलरच्या हवा इतकी थंड असते की, खोलीचे तापमान 15 डिग्रीपर्यंत कमी होते.

  बॉडी और किंमत
  या कुलरची बॉडी उच्च प्रतीच्या धातूपासून तयार करण्यात आली आहे. बॉडीला पावडर कोटेड केलेल आहे. यामुळे हा अॅन्टी-रस्ट असल्याचा कंपनीने दावा केला आहे. कंपनीकडून या कुलरच्या बॉडी आणि मोटरवर 3 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. तसेच कुलरला दूर अंतरावरून कंट्रोल करण्यासाठी रिमोट देण्यात आला आहे. यामध्ये ह्यूमिनिटी कंट्रोल, पावर आणि वॉटर सेव्हिंग ईको-मोड दिला आहे. 70 आणि 90 लीटर वॉटर टँकचे दोन मॉडल आहेत. याची सुरुवाती किंमत 14,990 रूपये सांगण्यात येत आहे.

  हे फीचर्स देखील मिळणार

  यामध्ये कार्बन डस्ट फिल्टर, ऑटो फिल टँक, ड्रॅन प्लग, अॅन्टी बॅक्टेरिया टँक, अॅन्टी मॉसकीटो ब्रीडिंग यांसारखे हायटेक फीचर्स आहेत. यासोबतच कुलरची उंजी कमी जास्त करण्यासाठी ट्रॉली येते.

Trending