Home | National | Other State | India's first Space mission in 2021

भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम 2021 मध्ये; तीन सदस्य सात दिवस राहणार अंतराळात 

वृत्तसंस्था | Update - Jan 12, 2019, 07:36 AM IST

गगनयान मोहिमेसाठी केंद्र सरकारने ९,०२३ कोटी रुपयांच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

  • India's first Space mission in 2021

    बंगळुरू- भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेतील गगनयान' डिसेंबर २०२१ मध्ये प्रक्षेपित केले जाईल. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी ही माहिती दिली. या मोहिमेत महिला अंतराळवीरही सहभागी होऊ शकेल.

    गगनयान मोहिमेसाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती देताना सिवन यांनी सांगितले, की मानवी मोहिमेपूर्वी डिसेंबर २०२० आणि जुलै २०२१ मध्ये मानवरहित यान अंतराळात पाठवले जाईल. गगनयानसाठी अंतराळवीरांना भारतातच प्रशिक्षण दिले जाईल. महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात असून लँडर आणि रोव्हर चंद्रावर घेऊन जाणाऱ्या या यानाचे प्रक्षेपण एप्रिल किंवा मेमध्ये केले जाईल.

    ९ हजार कोटींचा निधी
    गगनयान मोहिमेसाठी केंद्र सरकारने ९,०२३ कोटी रुपयांच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तीन अंतराळवीर सात दिवस अंतराळात राहू शकतील, असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गेल्या डिसेंबरमध्ये सांगितले होते.

Trending