देशाची पहिली सुपर बाइक यामाहा RD350 नव्या अवतारात, दमदार लूक आणि युनिक स्टाइलमध्ये सादर


स्पीडमध्ये रॉय इनफील्ड बुलेटला सुध्दा देते टक्कर 
 

दिव्य मराठी वेब टीम

Apr 15,2019 05:05:00 PM IST

ऑटो डेस्क- भारतात 80 च्या दशकात यामाहा RD350 चा दबदबा होता. या बाइकचा आजही एक फॅन फॉलोइंग आहे. यामधूनच एका फॅनने या जुन्या मोटरसायकलला नव्या लूक आणि शानदार स्टाईलमध्ये तयार केले आहे. पुण्याच्या एका वर्कशॉपने RD350 ला मॉडिफाइड करण्याचे काम केले आहे.

नवा लुक आणि युनिक स्टाइलमध्ये सादर
यामाहाच्या या बाईकच्या फ्युअल टॅंकवर कंपनीचा लोगो लावण्यात आला आहे. बाईकमध्ये ऑफ्टर मार्केट इंस्ट्रुमेंट कंसोलचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे बाइक अधिक शानदार दिसते. या सोबतच बाइकमध्ये डिजीटल युनिटचा वापर करण्यात आला आहे, जे रायडरचे गिअर शिफ्ट, स्पीड, डिस्टेंसची माहिती देईल. या बाइकमध्ये फ्रंट आणि रिअरला स्पोक व्हील बसवले आहेत. बाइकमध्ये नवे स्टायलिश सीट आणि मोठे टायर बसवले आहेत. सोबतच फ्रंट आणि रिअर डिस्कब्रेक लावण्यात आले आहेत. त्याव्यतिरीक्त जून्या फॉर्क्स ऐवजी गोल्ड फिनिश असलेले USD किट लावली आहे.


देशाची पहली सुपर बाइक
जेव्हा RD350 बाइकला भारतात लॉन्च केले, त्यावेळी पॉवरफुल बाइक्समध्ये बुलेट 350, जावा( येजदी ) 250आणि राजदूत 175 सीसी दोन स्ट्रोक मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. पण ही एकच मोटारसायकल होती, जी 31 बीएचपी पर्यंत पॉवर देत होती. त्यामुळेच या बाइकला देशाची पहिली सुपर बाइक म्हटले जायचे.


भारतीय पोलिसांची आवडती बाइक
RD350 ला भारतात 1983-1990 साली बनवण्यात आले. या बाइकच्या पहिल्या एडिशनला एचटी ( हाय टॉर्क ) म्हटले गेले. ते इंजिन 31 बीएचपी पॉवर तयार करण्याची क्षमता ठेवत होते. RD350 ला भारतीय ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आले आणि ही बाइक त्यांच्या आवडिची झाली. याआधी ट्रफिक पोलिस बुलेट 350 वापरत होते. परंतू याची स्पीड खूप जास्त असल्यामुळे लोकांचे अपघाताचे प्रमाण वाढले.

इंजिन आणि पॉवर
इंजिन : 347 सी.सी. दोन स्‍ट्रोक इंजिन
पॉवर : 31 बीपीएच
टॉर्क : 32.3 एनएम
गिअर : 6 गि‍यर (एक खाली आणि 5 वरील पॅटर्न )
टॉप स्‍पीड : 160 कि‍मी प्रती तास (16 सेकंदात 150 कि‍मी प्रती तासाची स्‍पीड)

X
COMMENT