आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
उज्जैन - 4 वर्षीय चिमुरडीच्या बलात्कार प्रकरणात उज्जैनच्या एका न्यायालयाने आरोपपत्र सादर केल्याच्या अवघ्या 6 तासांतच निकाल सुनावला आहे. सोमवारी न्यायालयाने बलात्कार कारणाऱ्या 14 वर्षीय मुलाला 2 वर्षे बालसुधारगृहात पाठवण्याचा निकाल दिला आहे. पोलिसांच्या मते, बलात्काराच्या प्रकरणात एवढ्या लवकर निकाल येण्याची ही देशाची पहिलीच घटना आहे. ही घटना फक्त 6 दिवसांपूर्वीची आहे.
काय होते प्रकरण...
उज्जैन जिल्ह्यातील जलवा गावातील रहिवासी 4 वर्षीय बालिकेवर 15 ऑगस्ट रोजी गावातीलच एका अल्पवयीन मुलाने घरी बोलावून बलात्कार केला होता. घटनेनंतर मुलगा पळून राजस्थानात आपल्या नातेवाइकाच्या घरी गेला होता. दुसऱ्या दिवशी पोलिस पथकाने तेथे पोहोचून त्याला ताब्यात घेतले. एसपी सचिन अतुलकर म्हणाले की, 24 तासांतच डीएनए रिपोर्ट मिळाली, ज्यात चिमुरडीवर बलात्काराला दुजोरा मिळाला. यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता मालनवासा येथील न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. न्यायाधीश तृप्ती पांडे यांनी तत्काळ सुनावणी सुरू केली. साक्षीदार, इतर पुरावे, मेडिकल तसेच डीएनए रिपोर्टच्या आधारावर न्यायालयात अल्पवयीन मुलगा दोषी आढळला.
दुसरे प्रकरण:
बलात्कारानंतर किशोरवयीन मुलीला जिवंत जाळणाऱ्याला फाशीची शिक्षा
बीना/सागर - भागगड परिसरातील देवल गावात 15 वर्षीय किशोरवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याप्रकरणी बीनाचे अपर जिल्हा सत्र न्यायाधीश आलोक मिश्रा यांनी 22 वर्षीय रब्बू ऊर्फ सर्वेश सेन याला फाशी शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यात या प्रकारच्या अॅक्ट संशोधनानंतर हा 5 वा निकाल आहे. कोर्टाने याप्रकरणी घटनेच्या 8 महिन्यांनंतर निकाल दिला. देवल गावात 7 डिसेंबर 2017 रोजी रात्री 8.30 वाजता रब्बूने किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर केरोसिन ओतून तिला जिवंत जाळले होते. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आणखी एक अल्पवयीन आरोपीची केस न्यायालयात विचाराधीन आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.