आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India's First Win In Super Over; New Zealand's Fifth Loss, Rohit Sharma Finally Won The Team By Two Sixes In The Last Two Balls.

भारताचा प्रथमच सुपर ओव्हरमध्ये विजय; न्यूझीलंडचा पाचवा पराभव, रोहित शर्माने अखेरच्या 2 चेंडूंवर 2 षटकार खेचत संघाला विजयी केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेमिल्टन : भारताने तिसऱ्या टी-२० मध्ये न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये हरवले. संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० ने अजेय आघाडी मिळवली. भारताने पहिल्यांदा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. न्यूझीलंडचा पाचव्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला. भारताने ५ बाद १७९ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेदेखील ६ बाद १७९ धावा काढल्या. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने १७ धावा केल्या. सामनावीर ठरलेल्या रोहित शर्माने अखेरच्या २ चेंडूंवर २ षटकार खेचत विजय मिळवून दिला. टीम इंडिया विदेशात २ टी-२० मालिकेत ३ पेक्षा अधिक सामने जिंकणारी पहिली टीम बनली. चौथा सामना ३१ जानेवारी रोजी वेलिंग्टन येथे खेळवला जाईल.

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतासाठी रोहित (६५) व लाेकेश राहुलने (२७) पहिल्या गड्यासाठी ९ षटकांत ८९ धावा काढल्या. शिवम दुबे (३) अपयशी ठरला. कर्णधार कोहलीने ३८ व श्रेयस अय्यरने १७ धावा काढल्या. मनीष पांडे १४ व रवींद्र जडेजा १० धावांवर नाबाद राहिला. वेगवान गोलंदाज बेनेटने ३ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात गुप्टिल (३१) व मुन्रोने (१४), कर्णधार केन विलियम्सनने (९५) टी-२० चे अकरावे अर्धशतक झळकावले. टेलरने १७ धावा केल्या. बुमराह महागडा गोलंदाज ठरला, त्याने ४५ धावा दिल्या. शार्दूल ठाकूर व मो. शमीने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

अंतिम ४ चेंडूंवर शमीने एक धाव दिली; २ बळी घेतले

२० व्या षटकांत न्यूझीलंडला ९ धावा हव्या होत्या. शमीच्या पहिल्या चेंडूवर टेलरने षटकार, दुसऱ्यावर १ धाव निघाली. तिसऱ्या चेंडूवर विलियम्सन झेलबाद केले. चौथ्या चेंडू सिफर्टने निर्धाव खेळला. पाचव्यावर १ धाव घेतली. सहाव्यावर टेलरला बाद केले.

सुपर ओव्हर


न्यूझीलंड (गोलंदाज बुमराह)
पहिला चेंडू : १ धाव : विलियम्सन
दुसरा चेंडू : १ धाव : गुप्टिल
तिसरा चेंडू : ६ धावा : विलियम्सन
चौथा चेंडू : ४ धावा : विलियम्सन
पाचवा चेंडू : १ धाव : बाईज
सहावा चेंडू : ४ धावा : गुप्टिल


भारत (गोलंदाज साऊथी)
पहिला चेंडू : २ धावा : रोहित
दुसरा चेंडू : १ धाव : रोहित
तिसरा चेंडू : ४ धावा : राहुल
चौथा चेंडू : १ धाव : राहुल
पाचवा चेंडू : ६ धावा : रोहित
सहावा चेंडू : ६ धावा : रोहित

विराट कोहली कर्णधार म्हणून टी-२० व कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय

कोहलीच्या टी-२० मध्ये कर्णधार म्हणून ११२६ धावा झाल्या. तो सर्वाधिक धावा करण्यारा भारतीय कर्णधार बनला. त्याने धोनीला (१११२) मागे सोडले. कोहलीच्या पुढे केवळ दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस (१२७३) आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन (१२४३) आहे. कोहली (५१०४) कसोटीत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला. विलियम्सन कर्णधार म्हणून टी-२० मध्ये ९ वेळा ५० + धावा केल्या. यादरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे,टी-२०) सलामीवीर म्हणून १० हजार धावा पूर्ण केल्या.