Home | International | Other Country | India's footsteps for the astronautical test is right

मिशन शक्ती : अंतराळातील उपग्रहभेदी चाचणीचे भारताचे पाऊल योग्य - अमेरिका, नासाने १० दिवसांपूर्वी मोहिमेला भयंकर संबोधले

वृत्तसंस्था | Update - Apr 13, 2019, 12:07 PM IST

अमेरिकी संसदेच्या सशस्त्र सेवा समितीत उपग्रह प्रतिबंधक मिशनवर बैठक

 • India's footsteps for the astronautical test is right

  वॉशिंग्टन - अमेरिकेने भारताच्या उपग्रहभेदी मोहिम अर्थात मिशन शक्तीचे समर्थन केले आहे. या प्रकरणात अमेरिकेच्या संसदेच्या सशस्त्र सेवा समितीची बैठक झाली. त्यात कूटनीतिची धूरा सांभाळणारे जनरल जॉन इ हितेन म्हणाले, अंतराळाद्वारे समोर येऊ पाहत असलेल्या भविष्यातील धोक्यामुळे चिंतीत आहे. ते पाहता अंतराळात उपग्रह पाडण्याचे भारताचे पाऊल योग्य ठरवावे लागेल. ही काळाची गरज आहे. भारताकडे अंतराळात आपला बचाव करण्याची क्षमता असली पाहिजे. लोकप्रतिनिधी टीम काईन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. भारताच्या उपग्रह प्रतिबंधक मोहिमेमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका असल्याचे ते म्हणाले. चीनने देखील २००७ मध्ये चाचणी घेतली होती. त्यामुळे अंतराळात १० हजार तुकडे विखुरले होते. ही गोष्ट अंतराळासाठी धोकादायक आहे. २००९ मध्ये अमेरिका व रशियाच्या उपग्रहांची टक्कर झाली होती. वास्तविक दहा दिवसांपूर्वी या मोहिमेला नासाने विरोध दर्शवला होता. ही मोहिम भयंकर आहे, असे म्हटले होते.

  पेन्टागॉनचा इशारा : चीन जागतिक नौदल सुरू करण्याच्या प्रयत्नात

  अमेरिकेचा संरक्षण विभागाने चीनच्या वन बेल्ट अँड रोड प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली. चीन याप्रकल्पाच्या आडून जागतिक नौदल बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे नौदल मोहिमांचे प्रमुख जॉन रिचर्ड्सन यांनी संसदेच्या सशस्त्र सेवा समितीला सांगितले. चीन कर्ज देऊन इतर देशांना अॅनाकोंडासारखे पकडू लागला आहे. चीनची कूटनीति, आर्थिक रणनीतिचा हा भाग आहे.

  अमेरिकेची रणनीती : ट्रम्प यांना अंतराळातही सैन्य तैनातीची इच्छा

  अंतराळतही सैन्य तैनात करावे अशी इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या योजनेवर कामाला लागा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे अंतराळातील अमेरिकी संपत्तीचे संरक्षण होऊ शकेल, असे अमेरिकेला वाटते. काही खासदारांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

  दहशतवादावर इशारा : चीनने मसूदबाबत २३ पर्यंत काय ठरवायचे ते ठरवावे

  चीनने जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अजहर प्रकरणात २३ एप्रिल पर्यंत निर्णय घ्यावा, असे अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने सुनावले. चीनने मसूदला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यासाठी पाठिंबा द्यायला हवा.तसे झाले नाहीतर तीनही देश सुरक्षा परिषदेत नवा प्रस्ताव मांडतील. ही माहिती सर्व १५ सदस्यांना देण्यात आली आहे.

Trending