आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन : जागतिक बँकेने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन(जीडीपी) वृद्धी दराचा अंदाज घटवून ५% केला आहे. दुसरीकडे, २०२०-२१ साठी ५.८% चा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारनेही आपल्या अंदाजात वृद्धी दर ५% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वित्तीय क्षेत्रातील अडचणी आणि मॅन्युफॅक्चरिंग व बांधकाम क्षेत्राच्या कमकुवत प्रदर्शनामुळे वृद्धी दराचा अंदाज घटवला आहे. जागतिक बँकेने जागतिक आर्थिक शक्यता नावाने अहवाल जारी केला आहे. त्यानुसार, बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्राच्या कर्ज वितरणात नरमाईमुळे भारतात देशांतर्गत मागणीवर बराच परिणाम झाला आहे. कर्जाची अपुरी उपलब्धता आणि वैयक्तिक ग्राहकीत कमतरतेमुळे उत्पादन मर्यादीत राहिले आहे. हे ११ वर्षातील सर्वात मंद वृद्धी दर असेल. अहवालात भारताबाबत नमूद केले की, २०१९ मध्ये आर्थिक हालचालींत घसरण आली आहे. निर्मिती आणि कृषी क्षेत्रात घसरण अधिक राहिली.
जागतिक अर्थव्यवस्था : वृद्धी २.४%
जागतिक बँकेने २०१९ आणि २०२० साठी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी वृद्धी दराच्या अंदाजात ०.२% ची कपात केली आहे. त्यानुसार, २०१९ मध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेची वृद्धी २.४% आणि २.७% चा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजातील कपातीमागे व्यापार व गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा कमी वसुली झाल्याचे कारण सांगितले आहे.
कामगार उत्पादकता वाढवावी
देशाचा ८% आर्थिक वृद्धी दर प्राप्त करण्यासाठी कामगार उत्पादकता ६.३% दराने वाढवावी लागेल. इंडिया रेटिंग्जने गुरुवारी हा अहवाल जारी केला. नऊ टक्क्यांच्या जीडीपी वृद्धी दरासाठी कामगार उत्पादकता ७.३ टक्क्यांवर न्यावी लागेल. रेटिंग्ज संस्थेनुसार, आर्थिक नरमाई पाहता नजीकच्या भविष्यात ती प्राप्त होण्याची शक्यता नाही. मात्र, हे शक्य नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.