आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाने आशियाई विक्रमासह जिंकले सुवर्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशियाई नेमबाजी भारताला २ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके
  • ५० मी. रायफल प्रो गटात दोन्ही संघ नंबर वन राहिले
  • या प्रकारात वैयक्तिक रौप्य व कांस्यपदक मिळाले

​​​​​​दोहा : आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये बुधवारी भारताचे वरिष्ठ खेळाडू अपयशी ठरले. ते एकही कोटा आणि पदक जिंकू शकले नाही. मात्र, कनिष्ठ खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली. पुरुष व महिला कनिष्ठ संघाने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्ण जिंकले. नीरज कुमार, आबिद अली खान, हर्षराजसिंग गोहिल या कनिष्ठ संघाने आशियाई विक्रमासह प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय संघाने एकूण १८४५ गुणांची कमाई केली. नीरजने एकूण ६१६.३, आबिदने ६१४.४, गोहिलने ६१४.३ असे गुण मिळवले. चीनच्या संघाने रौप्य आणि कोरियन संघाने कांस्य जिंकले. चीनने १८४४.४ व कोरियाने १८१८ गुण मिळवले.


कनिष्ठ महिला गटात भारतीय टीमने एकूण १८३६.३ गुणांची कमाई केली. निश्चलने ६१५.३, भक्ती भास्करने ६१४.२ आणि किनोरी कोनारने ६०६.८ गुण आपल्या खात्यात जमा केले. पुरुष गटाप्रमाणे महिलांमध्ये चीनच्या संघाने १८२९.१ आणि कोरिया संघाने १८२०.७ गुणांसह अनुक्रमे रौप्यपदक आणि कांस्यपदक पटकावले.

वैयक्तिक प्रकारात निश्चल-भक्तीला पदके
५० मीटर रायफल प्रोन प्रकारात कनिष्ठ वैयक्तिक गटात निश्चल आणि भक्तीने पदक जिंकले. निश्चलने रौप्य आणि भक्तीने कांस्यपदक जिंकले. निश्चलने ६१५.१ गुण व भक्तीचे ६१४.२ गुण होते. चीनच्या मा युटिंगने ६१८.१ गुणांसह सुवर्ण आपल्या नावे केले. पुरुषांत नीरजने रौप्य व आबिदने कांस्य जिंकले. नीरजने ६१६.३ व आबिदने ६१४.४ गुण मिळवले. चीनच्या यू हाओने सोने जिंकले.