आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वात मोठा डबल डेकर पूल; फायटर जेटही लँड करता येईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोगीबिल- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ब्रह्मपुत्रा नदीवर उभारलेला देशातील सर्वात लांब रेल्वे आणि रोड पुलाचे उद‌्घाटन केले. खालच्या डेकवर २ रेल्वे ट्रॅक, तर वरच्या डेकवर तीनपदरी रस्ता आहे. आपत्कालीन परिस्थितीत यावर  लढाऊ जेट लँड करू शकतील. रुळावर ताशी १०० च्या वेगाने रेल्वे धावू शकेल. दिब्रुगड व धेमाजी जिल्ह्यांना जोडणारा हा ४.९४ किमी लांब देशातील एकमेव वेल्डेड पूल आहे. तो ७ रिश्टर तीव्रतेचा भूकंपही सहज सहन करू शकतो.

 

पुलामुळे असा होणार फायदा
आधी धेमाजी ते दिब्रुगड हा ५०० किमी प्रवास करण्यासाठी ३४ तास लागायचे. आता फक्त १०० किमी व ३ तासांचा प्रवास असेल. दिब्रुगड ते इटानगरचे अंतर रस्ते मार्गाने १५०, तर रेल्वेमार्गाने ७०५ किमीने घटले आहे. भारत-चीन सीमेवर लष्कराला मदत मिळेल.
 
लष्करालाही मिळणार मोठी मदत   : 
दिब्रुगड व धेमाजी जिल्ह्यांना जोडणारा हा ९.९४ किमी डबल डेकर पूल सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवर सैनिक व लष्करी उपकरणांची ने-आण सोपी होईल. एका सूत्राने सांगितले की, सुरक्षा दलांना तेजपूर येथून रसद मिळवण्याबाबतची समस्या दूर होईल. एनएफआरचे मुख्य पीआरओ प्रणव ज्योती शर्मा यांनी सांगितले की, या पुलामुळे सीमेवर तैनात भारतीय लष्कराला लॉजिस्टिकसंबंधी मोठी मदत मिळणार आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...