आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाच्या बारकोड सायन्स समितीत आता 'बामू' करतेय भारताचे नेतृत्व 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जगाच्या बारकोड सायन्स समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हबर्ट बारकोड सेंटरची निवड झाली आहे. समितीत प्रा. डॉ. गुलाब खेडकर हे भारताचे नेतृत्व करत आहेत. 

 

दहा वर्षांपूर्वी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात पॉल हबर्ट डीएनए बारकोड सेंटरची स्थापना या विभागातील प्रा. खेडकर यांनी केली होती. विभागाने आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन केल्याने जगाच्या बारकोड सायन्स समितीत हा विभाग भारताचे नेतृत्व करत आहे. बारकोड ऑफ लाइफ या नावाने इंटरनेटवर सर्च केले की, या संघटनेची माहिती मिळते. जगभरातील तीस दिग्गज सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ आणि त्यांची जीवसृष्टीशी संबंधित संशोधन यात दिले आहे. यात युरोपातील शास्त्रज्ञच मोठ्या संख्येने आहे. यात भारतातून डॉ. खेडकर तर पाकिस्तानातील बलुचिस्तान विद्यापीठातील प्रा. डॉ. नझीर अहमद यांची नावे आणि फोटोसह परिचय या साइटवर दिसतो. 

 

१०० पेक्षा जास्त संशोधन प्रकल्प सुरू :

सेंटरचे प्रमुख डॉ. खेडकर व त्यांची टीम देशातील नद्यांच्या पाण्याचा दर्जावर संशोधन करत आहे. तसेच जलचर जिवांच्या जातींची गणना करून त्याचे बारकोडिंग करणे, भारतीय विषारी, बिनविषारी सापांच्या जातींचे बारकोडिंग करण्याचे काम पूर्ण केले आहे. तसेच भारतीय देशी गायींच्या जीनोमवर (अंडामृतपेशी) विशेष संशोधन सुरू आहे. असे तब्बल शंभरपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प येथे सुरू आहेत. 

 

विभागाने शंभर वर्षांचा रोडमॅप केला तयार 
जगातील ७ टक्के जैवविविधता एकट्या भारतात आहे. या सर्वांचे जीनोम (अंडामृतपेशी) शोधून त्याचे बारकोडिंग करण्याचे अवघड काम विद्यापीठातील डीएनए बारकोडिंग सेंटरने घेतले आहे. जसे लाखो प्रकारचे कीटक, फुलपाखरे त्यांच्या जाती-प्रजाती शोधून त्याचे बारकोडिंग केले आहे. या बारकोड सेंटरने संशोधनात पुढील शंभर वर्षांचा रोडमॅप तयार करून तो वेबसाइटवर अपलोड केला आहे. त्याची दखल जगाने घेेतली आहे. सध्या या ठिकाणी छोट्याशा जागेत अद्ययावत प्रयोगशाळा बांधण्याचे काम सुरू आहे. सरकारने ३ कोटी ९८ लाखांच्या मशीन टेंडर काढून विकत घेऊन दिल्याचे प्रा. खेडकर म्हणाले. 
 

बातम्या आणखी आहेत...