आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची मिताली राज १०० सामने जिंकणारी दुसरी कर्णधार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा - भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या घरच्या मैदानावर पाहुण्या दक्षिण आफ्रिका टीमचा वनडे मालिकेत धुव्वा उडवला. भारताच्या महिला संघाने साेमवारी तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात आफ्रिकेवर सहा धावांनी मात केली. यासह भारताने तीन वनडे सामन्यांची मालिका ३-० ने आपल्या नावे केली. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिकेत एकतर्फी विजयाची नाेंद केली. 
 
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४५.५ षटकांत १४६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा १४० धावांवर खुर्दा उडवला. यासह भारताने ही मालिका ३- ० ने आपल्या नावे केली. एकता बिस्ट (३/३२), दीप्ती शर्मा (२/२४) आणि राजेश्वरी गायकवाड (२/२२ ड)यांंच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारताने तिसऱ्या सामन्यात बाजी मारली. 

मितालीच्या नेतृत्वात विजयी शतक : कर्णधाराच्या भूमिकेत मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने विजयाचे शतक साजरे केले. हे तिन्ही फाॅरमॅटमधील विजय ठरले. अशा प्रकारची कामगिरी करणारी मिताली ही जगातील दुसरी कर्णधार ठरली. पहिल्या स्थानावर एडवर्ड््स (१४२ विजय) आहे.
 

मितालीच्या नेतृत्वात विक्रमी विजय

> वनडे    129    विजय    80
> टी20    32    विजय    17
> कसाेटी    6    विजय    3