Home | Business | Business Special | india's most eligible bachelor business girls

या आहेत देशातील सर्वात ग्लॅमरस एलिजिबल बॅचलर बिझनेस गर्ल्स, जाणून घेऊयात त्यांच्याविषयी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 10:24 AM IST

या यादीत जयंती चौहान, नव्या नंदा, अनन्या बिर्ला यांचेही नाव सामील..

 • india's most eligible bachelor business girls

  नवी दिल्ली : देशातील बऱ्याच व्यावसायिक घरातील मुली त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत आहेत. या यादीमध्ये मोठमोठ्या व्यावसायिक घरातील मुलीची नावे आहेत. त्यात जयंती चौहान, नव्या नंदा, अनन्या बिर्ला अशाच अनेक बॅचलर बिझनेस गर्ल्सचा समावेश आहे. या सर्व जणी त्यांचा व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळतात आणि त्यामुळेच त्या मोस्ट एलिजिबल बॅचलर बिझनेस गर्ल्स झाल्या आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या आवडीनिवडींविषयी.

  अनन्या बिर्ला
  कुमार मंगलम आणि नीरजा बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला हीने नुकतेच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. अनन्याने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केले आहे. तिने माक्रोफायनान्स फार्मला प्रायव्हेट लिमिटेड बनवले आहे. तिचा हा बिझनेस देशातील दोन राज्यांमध्ये चालतो. या व्यवसायासाठी तिच्या कुटुंबानेच तिला आर्थिक मदत पुरविली आहे. तिचे दोन म्युझिक अल्बमही प्रदर्शित झालेले आहेत. त्यांना संगीताची आवड आहे.

  पुढे वाचूयात जयंती चौहानविषयी..

 • india's most eligible bachelor business girls

  जयंती चौहान
  बिसलेरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान हिने आपल्या वडिलांचा व्यवसाय खूप चांगला सांभाळला आहे. सॉफ्ट ड्रिंक किंग म्हणून ज्यांना ओळखले जाते असे रमेश चौहान यांनी लिम्का, थम्स अप यांसारख्या प्रोडक्टसच्या मदतीने बिसलेरी इंटरनॅशनलला एका नवीन उंचीवर नेले आले. रमेश चौहान यांनी आपल्या वाढत्या वयामुळे त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर या व्यवसायाचा भार सोपवला. जयंतीने वडिलांच्या अपेक्षा सार्थ केल्या आणि कंपनीच्या यशात भर घातली. डायरेक्टर म्हणून जयंती ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगवर जास्त भर देते. जयंतीला फोटोग्राफी करण्याची आवड आहे. 

   

  पुढे वाचूयात मानसी किर्लोस्करविषयी.. 

 • india's most eligible bachelor business girls

  मानसी किर्लोस्कर

  मानसी किर्लोस्कर ही देशातील मोठमोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टोयोटा किर्लोस्कर एम्पायरची एकुलती एक मालकीण आहे. मानसी विक्रम किर्लोस्करची मुलगी आहे. किर्लोस्कर सिस्टम लिमिटेडची डायरेक्टर म्हणून आता मानसी काम पहाते. मानसीला भटकंतीची आवड आहे. 

   

  पुढे वाचूयात नव्या नवेली नंदाविषयी.. 

 • india's most eligible bachelor business girls

  नव्या नवेली नंदा

  इस्कोटर्स ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर निखिल नंदा आणि श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नवेली नंदा ही तिचे ग्लॅमरस लाईफ आणि स्टाईलमुले  सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. नव्या नवेली नंदा पहिल्यांदा २०१७ साली वोग ब्युटी अवॉर्ड मध्ये आपल्या आज्जी-आजोबा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत दिसली होती. ती तिच्या वडिलांच्या व्यवसायातही आता हातभार लावते आहे. 

   

  पुढे वाचूयात ईशा अंबानीविषयी.. 

 • india's most eligible bachelor business girls

  ईशा अंबानी

  बॅचलर मुलींच्या लिस्ट मध्ये असलेली ईशा अंबानी 12 डिसेंबरला आनंद पिरामल यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन अनिल अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी व्यावसायिक जगतातही खूप प्रसिद्ध आहे. ईशा अंबानी तिचा भाऊ आकाश अंबानी याच्यासोबत 'रिलायन्स जीओ' हा प्रोजेक्ट बघते. यापूर्वी तिने अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन करून मॅकेन्जीमध्ये काम केले होते. ईशा अंबानीला पियानो वाजवणे आवडते. 

Trending