आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होतो तरुणींच्या देहाचा सौदा, संपूर्ण देशात बदनाम आहे हे शहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुरी- भारतामधील काही रेड लाइट एरिया खूप चर्चेत असतात. मेट्रो सिटींशिवाय अनेक राज्यांतील विविध शहरांचा यात समावेश आहे. दिल्ली, वाराणसी, कोलकात्याव्यतिरिक्त इतरही अनेक शहरांतील हा रेड लाइट एरिया तेथे येणाऱ्या बाहेरील लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. परंतु आज आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशातील अशा एका रेड लाइट एरियाविषयी सांगत आहोत. येथील एक गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्ही हादरून जाल. मध्य प्रदेशाविषयी माहिती असलेल्या लोकांना येथील शिवपुरी गावाविषयीसुद्धा माहिती असेल. शिवपुरी मध्यप्रदेशातील एक बदनाम ठिकाण आहे. येथे अत्यंत कवडीमोल भावात मुलींची बोली लावली जाते.


मुलींच्या खरेदी-विक्रीसाठी संपूर्ण देशात बदनाम असलेल्या या ठिकाणी दररोज छापे पडत राहतात. याठिकाणी बेकायदेशीररीत्या मुलींचा सौदा केला जातो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, एमपीमध्ये शिवपुरी येथे फक्त 20 रुपयांच्या सरकारी स्टॅम्पवर मुलींना विकले जाते. खरंच...! हे ऐकल्यानंतर विश्वास ठेवणे अवघड जाईल परंतु हे सत्य आहे. या संपूर्ण काळ्या धंद्यामगे एक प्राचीन प्रथा आहे. मुलींच्या खरेदी-विक्रीचा हा काळा धंदा येथे अनेक वर्षांपासून सुरु आहे. ही प्रथा 'धडीचा' नावाने ओळखला जातो. 'धडीचा' येथील एक प्राचीन प्रथा आहे. सरकारच्या खूप प्रयत्नानंतरही ही प्रथा अजूनही संपुष्टात आलेली नाही.


येथील स्थानिक लोक 'धडीचा' प्रथेच्या नावाखाली अनेक वर्षांपासून मुलींचा सौदा करत आहेत. मुलगी विकत घेण्यासाठी चक्क काँट्रॅक्टवर स्वाक्षरी घेतली जाते. हे कॉन्ट्रॅक्ट एक रात्रीचे असते. परंतु तुम्ही जास्त पैसे दिले तर आणखी जास्त काळासाठी कॉन्ट्रॅक्ट वाढवले जाते. एका पुरुषासोबत कॉन्ट्रॅक्ट संपले की मुलीला दुसऱ्या पुरुषासाठी तयार केले जाते.  

 

बातम्या आणखी आहेत...