आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... मलायका आणि सनी लिओनीसमोर परफॉर्म करत होती ही स्पर्धक, अचानक उघडली ब्लाऊजची हुक, तरीही करत राहिली डान्स : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल' सीझन 4 मध्ये एक स्पर्धक स्टेजवर परफॉर्म करत असताना अचानक ऊप्स मोमेंट (वार्डरोब मालफंक्शन) ला बळी पडली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुठेही न डळमळता या स्पर्धकाने आपला परफॉर्मन्स पुर्ण केला. परफॉर्मन्स संपल्यानंतर शोची जज मलायका अरोराने जयपूरहून आलेल्या या स्पर्धकाचे तोंडभरुन कौतुक केले.


ही आहे संपूर्ण घटना... 
या शोमध्ये जयपूरची तमन्ना शर्मा पहिली स्पर्धक म्हणून मंचावर आली. तिने अक्षय कुमारच्या  गाजलेल्या 'कुंडी मत खडकाओ राजा...' या गाण्यावर डान्स सुरु केला. परफॉर्म करत असताना अचानक तमन्नाच्या ब्लाऊजची हुक  तुटली.  या अवघड परिस्थितीत तमन्नाने आपले नृत्य थांबवले नाही. तिने एका हाताने ब्लाऊज सावरत परफॉर्मन्स पूर्ण केला. यावेळी तिने चेह-यावर टेन्शनही दिसू दिले नाही. डान्स परफॉर्मन्स संपल्यानंतर शोची जज मलायकाने तमन्नाला म्हटले, तू ब्लॅकस्टेज जाऊन कपडे सावरुन घे. त्यानंतर तमन्ना पुन्हा स्टेजवर आल्यावर मलायकाने टाळ्या वाजवत तमन्नाचे तोंडभरुन कौतुक करताना म्हटले, 'तू अतिशय सुंदररित्या स्वतःला सावरले. माझ्या मते, प्रत्येकाच्या मनात कुठेतरी ही भीती असते, की स्टेजवर त्यांचे वार्डरोब मालफंक्शन होऊ नये.' तमन्ना म्हणाली, ''डांस करत असताना अचानक असे काही घडणे हे एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते. क्षणभर मनात विचार आला की, माझा कॉन्फिडन्स मी गमावून बसेल. पण शो सुरु असल्याने मी माझा परफॉर्मन्स पुर्ण करण्याचा निर्णय घेतला.''

बातम्या आणखी आहेत...