आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची जागतिक मानांकन टेनिस स्पर्धा; भारताची ऋतुजा, रिया भाटियाचा दुसऱ्या फेरीमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओअॅसिस पुरस्कृत २५ हजार अमेरिकन डॉलरच्या जागतिक मानांकन टेनिस स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले व रिया भाटिया यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.  कुमठा नाका येथील ज़िल्हा क्रीडा संकुलात सोमवारी झालेल्या सामन्यात ऋतुजाने तैपेईच्या या हसून लीचा ६-५ असा पहिल्या सेटमध्ये पराभव केला. त्यानंतर लीने दुखापतीमुळे हा सामना सोडून दिला. ऋतुजा ही मूळची करमाळ्याची आहे. दुसऱ्या सामन्यात रिया भाटियाने रशियाच्या अॅना मोरगिनाला ६-४ ६-३ असे नामविले.

 

दुहेरीत मात्र रिया भाटिया आणि झील देसाई या भारताच्या जोडीला कडव्या लढतीनंतर एडेन सिल्वा (इंग्लंड) आणि एरिका वोगेलसंग (नेदरलँड ) या जोडीकडून ६-७ (५), ६-४, १०-६ असा पराभव स्वीकारावा लागला. तसेच भारताची स्नेहल माने आणि हाँगकसँगची हो चिंग वू या जोडीलाही शारोन फिचमन ( कॅनडा) आणि कातरजयना पीटर (पोलंड) या जोडीकडून ०-६, ०-६ ने परराभव पत्कारावा लागला. 

 

अंकिता रैनाचा आज पहिला सामना 
मंगळवारी अंकिताचा पहिला सामना सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते नाणेफेक होईल. टेनिसप्रेमींना उपस्थित राहण्याचे अावाहन करण्यात अाले. 

सोमवारचे काही निकाल 


एकेरी : जीआ जिंग लू (चीन ) वि. वि. कयलाह मकपही (ऑस्ट्रिया ) ६-२ ७-६ (७) 
काई लिन झांग (चीन ) वि. वि. अमिना अंशबा (रशिया). 

मारियम बोलकवाडझे (जॉर्जिया) वि. वि. कातरजयना कावा (पोलंड) १-६,७-६(५),६-४ 

दुहेरी : सारह बेथ ग्रे आणि एकतेरिना याशिना वि. वि. पाउला क्रिस्तिना गोंकॅलवेस आणि चिइह यू हसू (तैपेई) ७-६ (३)३-६,१०-६. 
डायना मर्सिकेविचा (लाटविया) आणि अलेक्सान्द्रिना (बल्गेरिया ) वि. वि. बेअत्रिस गुमुल्या (इंडोनेशिया) आणि अॅना वेसेलिनीविच (माँटेनिग्रो ) ५-७,६-२,१०-८ 

बातम्या आणखी आहेत...