आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर - यजमान टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानावर शनिवारी सलामीच्या कसाेटीत बांगलादेशला तिसऱ्याच दिवशी धूळ चारली. भारताने डाव आणि १३० धावांनी सलामीची कसाेटी जिंकली. यासह भारताने दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता काेलकात्याच्या मैदानावर २२ नाेव्हेंबरपासून मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसाेटी सामन्याला सुरुवात हाेईल. ही भारत आणि बांगलादेश यांच्यातील डे-नाइट कसाेटी असेल.
भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेल्या खडतर लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघाची दुसऱ्या डावातही माेठी दमछाक झाली. त्यामुळे टीमला २१३ धावांवरच गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या वेगवान गाेलंदाजांनी माेठा विजय साकारला. पहिल्या डावात शानदार द्विशतक साजरे करणारा मयंक अग्रवाल हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय ठरला. कसाेटीच्या इतिहासामध्ये टीम इंडियाने फक्त दाेन वेळा सलग सहा सामने जिंकले आहेत. बांगलादेशला पहिल्या डावात १५० धावांवर राेखून भारताने ६ बाद ४९३ धावांवर आपला पहिला डाव घाेषित केला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला २१३ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने बांगलादेश संघाविरुद्ध १० सामन्यांत हा आठवा विजय साजरा केला आहे. यातील दाेन सामने ड्राॅ झाले हाेते. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घाेषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाची दुसऱ्या डावात निराशाजनक सुरुवात झाली.
कोहलीच्या नेतृत्वात सर्वात जास्त डावाने भारताचे विजय
कर्णधार मॅच डावाने विजय
विराट कोहली 52 10
महेंद्रसिंग धोनी 60 9
अझहरुद्दीन 47 8
तिसऱ्यांदा टीम सलग तीन कसाेटी डावाने विजयी,तीन वेळा घरच्या मैदानावर नांेंद
1. 1993: कर्णधार अझहरुद्दीन
2. 1994: कर्णधार अझहरुद्दीन
3. 2019: कर्णधार विराट कोहली
गत दाेन वर्षांत ५० बळी घेणारा शमी एकमेव :
गत नाेव्हेंबर २०१७ पासून आजतागायत सामन्याच्या तिसऱ्या आणि चाैथ्या डावात शमीने ५१ विकेट घेतल्या आहेत. अशा प्रकारची कामगिरी करणारा ताे पहिला गाेलंदाज ठरला. त्याने पहिल्या कसाेटीत सात बळी घेतले आहेत.
गाेलंदाज डाव विकेट 5 बळी
मोहम्मद शमी 20 51 3
पॅट कमिंस 18 48 2
नॅथन लायन 20 47 2
कागिसो रबाडा 16 34 1
रवींद्र जडेजा 15 32 0
भारताचे १००, २०० व आता ३०० गुण; पहिला संघ
संघ सामने विजय पराभव गुण
भारत 6 6 0 300
न्यूझीलंड 2 1 1 60
श्रीलंका 2 1 1 60
ऑस्ट्रेलिया 5 2 2 56
इंग्लंड 5 2 2 56
वेस्ट इंडीज 2 0 2 0
द. आफ्रिका 3 0 3 0
बांगलादेश 1 0 1 0
पाकने आतापर्यंत सामना खेळला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.