आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India's Semi final Match Against England Till Now 10 Defeats Have Been Defeated

भारताचा उपांत्य सामना इंग्लंडशी; अातापर्यंत 10 लढतींत झाला पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्थ साउंड - गत चॅम्पियन विंडीज अाणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर अाता साेमवारी महिलांच्या टी-२० विश्वचषकातील सेमीफायनल लाइनअप निश्चित झाली अाहे. इंग्लंडविरुद्ध राेमहर्षक विजयाने अाता विंडीज संघाने  स्पर्धेत अाॅस्ट्रेलियाविरुद्धचा अापला उपांत्य सामनाही निश्चित केला. 


दुसरीकडे भारताच्या महिला संघाला दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे. त्यामुळे अाता  विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील प्रवेशासाठी चार संघ अापले काैशल्य पणास लावणार अाहेत. यासाठी  उपांत्य सामन्यांचे अायाेजन करण्यात अाले. यातील एका उपांत्य सामन्यात गत विजेता विंडीज अाणि अाॅस्ट्रेलिया महिलांचे संघ समाेरासमाेर असतील,  


इंग्लंड टीमचा दबदबा 

महिलांच्या टी-२० फाॅरमॅटमध्ये इंग्लंड टीमचा भारतविरुद्ध अातापर्यंत दबदबा राहिला अाहे. या दाेन्ही संघात अातापर्यंत या फाॅरमॅटचे १३ सामने झाले. यातील १० सामन्यात इंग्लंडने विजयी पताका फडकवली.तर, भारताला ३ सामन्यात विजयाची नाेंद करता अाली. हे दाेन्ही संघ २००९ मध्ये विश्वचषकाच्या सामन्यात पहिल्यांदा समाेरासमाेर अाले हाेते.  अाता या सामन्यात बाजी मारण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल. 

 

विंडीज संघाने केला इंग्लंडचा पराभव
गत चॅम्पियन अाणि यजमान विंडीजच्या संघाने साेमवारी महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयाची नाेंद केली. यजमानांनी घरच्या मैदानावरील सामन्यात इंग्लंडच्या महिलांचा पराभव केला. विंडीज महिला संघाने ४ गड्यांनी सामना जिंकला. या विजयाच्या बळावर विंडीजने अाता अाॅस्ट्रेलियाविरुद्धचा अापला उपांत्य सामना निश्चित केला. दुसरीकडे पराभवामुळे इंग्लंडच्या महिलांना सेमीफायनलमध्ये भारतीय संघाच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल.  डॅरेन सॅमी अांतरराष्ट्रीय स्टेडियमवर यजमान विंडीजने सामना जिंकला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ११५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात विंडीजने १९.३ षटकांत सहा गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. डाेट्टिन (४६) अाणि कॅम्पबेल्लेच्या (४५) शानदार फलंदाजीच्या बळावर विंडीजने विजयश्री खेचून अाणली. विंडीजला राेखण्यासाठी शुबसाेलेने (३/१०) केलेली धारदार गाेलंदाजी व्यर्थ ठरली. तिला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही.

बातम्या आणखी आहेत...