आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील अव्वल २५० ऑलटाइम शोमध्ये भारताच्या सहा वेब सिरीज, २०० देशांमध्ये होत आहेत रिलीज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायक दुबे 

मुंबई - ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मवर सर्वात हिट डिजिटल कंटेंट देणाऱ्या नेटफ्लिक्सने २०१८ मध्ये आपली पहिली अशी वेब सिरीज तयार केली होती, ती पूर्णपणे भारतात तयार झाली होती. तिचे नाव सेक्रेड गेम्स, तिचा अलीकडेच दुसरा सीझनही आला आहे. या वेब सिरीजला भारतात प्रेक्षक मिळालेच, शिवाय जगभरात तिला पसंती मिळाली. नेटफ्लेक्सनुसार सेक्रेड गेम्स पाहणाऱ्या प्रत्येक तीन प्रेक्षकांपैकी दोन विदेशी होते. अशाच प्रकारे अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने मेड इन हेवल ही वेब सिरीज २०० देशांत रिलीज केली. त्यावरून जगभरात भारतीय वेब सिरीजची लोकप्रियता दिसते. आता देशात सुमारे ३० ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. अर्नेस्ट अँड यंग या प्रोफेशनल सर्व्हिसच्या अहवालानुसार, २०१९ मध्ये फक्त भारतातच सुमारे १२०० तासांचे ओरिजनल डिजिटल कंटेंट तयार केले जाईल.

चित्रपट आणि टीव्ही शोजचे रेटिंग देेणाऱ्या जगातील सर्वात प्रतिष्ठित वेबसाइट इंटरनेट मूव्ही डेटाबेसच्या (आयएमडीबी) टॉप २५० टीव्ही शोच्या यादीत आतापर्यंत देशातील ६ वेब सिरीजचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेब सिरीजलाही टीव्ही शो मानले जाते आणि या यादीत १९५५ पासून आतापर्यंतच्या शोजचा समावेश केला जातो. या ६ वेब सिरीजमध्ये नेटफ्लिक्सची सेक्रेड गेम्स आमि टीव्हीएफच्या ३ सिरीजचा समावेश आहे. त्यात सर्वात नवी एंट्री मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ची आहे. ती अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची सिरीज आहे. या वेब सिरीजव्यतिरिक्त ‘महाभारत’ आणि ‘सत्यमेव जयते’ या दोन टीव्ही शोचाही या यादीत समावेश आहे.

भारतीय वेब सिरीजचे यश ओटीटी मार्केच्या वाढत्या आकारातही दिसते. फिक्की आणि ईवायच्या अहवालानुसार २०१८ मध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये भारतात सुमारे २४ ते ३० कोटी प्रेक्षक होते. त्यात सुमारे १.५ कोटी पेड सब्सक्रिप्शन होते. असे मानले जात आहे की, २०२१ पर्यंत पेड सब्सक्रिप्शनची संख्या ३.५ कोटींपर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे व्हिडिओ स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन रिव्हेन्यू १३४० कोटी रुपयांवरून वाढून २०२१ मध्ये ५०५० कोटीं रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 
 

ओटीटीवर ७०% कंटेंट हिंदीत पाहत आहेत
 
गुगलच्या दाव्यानुसार यूट्यूबवर ९७% कंटेेंट स्थानिक भाषांत पाहिले जात आहे. हाच ट्रेंड ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आहे. तेथेही ९०% कंटेंट स्थानिक भाषित पाहत आहेत, त्यातही ७०% कंटेंट हिंदीत पाहत आहेत. विदेशातही भारतीय कंटेंटला पसंती मिळत आहे, त्यामुळे सबटायटल्स आणि डबिंगचे प्रमाण वाढले आहे. उदाहरणासाठी नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्ससह २४ भाषांत सबटायटल्स देण्यात आले आणि इंग्लिश, ब्राझिलियन, पोर्तुगाली, लॅटिन, स्पॅनिश आणि तुर्क भाषेत डबिंग करण्यात आले.