आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार; १९८३ नंतर पहिल्यांदा ४ अष्टपैलू खेळतील, आज पहिला सामना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू हाेत आहे. २०० देशांमधील ३० काेटी क्रिकेट चाहते १२ डिजिटल प्लॅटफाॅर्मवर सामने बघू शकतील. स्पर्धा ४६ दिवस चालेल. १० संघ आहेत. एकूण ४८ सामने हाेतील. उपांत्य फेरीत जाण्याआधी भारताला अन्य सर्व ९ संघांशी खेळावे लागेल. खास गाेष्ट म्हणजे विश्वचषक स्पर्धेत उतरलेल्या सर्वच संघांमध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा काढलेले फक्त दाेनच फलंदाज आहेत. ते आहेत, भारताचा कर्णधार विराट काेहली आणि माजी कर्णधार एम. एस. धाेनी. स्पर्धेचा आजचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ५ जून राेजी पहिला सामना हाेईल. 

 

> एका वर्षात भारतीय गाेलंदाजांनीच सर्वाधिक २०२ विकेट घेतल्या आहेत.  १६९ विकेटसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे.
> १९८३ नंतर पहिल्यांदा ४ अष्टपैलू  खेळतील- हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, विजय शंकर व केदार जाधव.


बक्षीस रक्कम
70 काेटी रुपये, मागील वर्ल्ड कपपेक्षा ८ % जास्त

 विजेत्या संघाला २८ काेटी रुपये मिळतील. मागील वर्षात २६ काेटी रुपये मिळाले हाेते.