Home | Sports | From The Field | India's third consecutive victory in the third series

राेहितचे विक्रमी शतक; भारताचा सलग सातवा व 34 दिवसांत विंडीजविरुद्ध तिसरा मालिका विजय

वृत्तसंस्था | Update - Nov 07, 2018, 09:13 AM IST

भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेतली.

 • India's third consecutive victory in the third series

  लखनऊ - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार राेहित शर्माच्या (नाबाद १११) धडाकेबाज विक्रमी शतकाच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी मालिका विजयाची नाेंद केली. भारताने मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या विंडीजवर ७१ धावांनी मात केली. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेतली. अाता मालिकेतील तिसरा सामना रविवारी हाेणार अाहे.

  घरच्या मैदानावर जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारताचा ३४ दिवसांत (४ अाॅक्टाेबर ते ६ नाेव्हेंबर) विंडीजविरुद्धचा हा सलग तिसरा मालिका विजय ठरला. यात क्रिकेटच्या कसाेटी, वनडे अाणि टी-२० या तिन्ही फाॅरमॅटचा समावेश अाहे. तसेच भारताचा टी-२० मधील हा सलग सातवा मालिका विजय ठरला अाहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १९५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात विंडीजला अवघ्या १२४ धावांवर राेखले.


  राेहितचे विक्रमी शतक : राेहितने विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यादरम्यान नव्या मैदानावर विक्रमाला गवसणी घातली. त्याने अापल्या टी-२० च्या करिअरमधील चाैथे शतक साजरे केले. यासह ताे यामध्ये शतकांचे चाैकार ठाेकणारा जगातील पहिला फलंदाज व कर्णधार ठरला. यापूर्वी ताे न्यूझीलंडच्या काेलिनसाेबत (३ शतक) संयुक्तपणे अव्वलस्थानी हाेता. याच शतकाच्या बळावर त्याने याच फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक धावांची २२०३ नाेंद अापल्या नावे केली.

  देशातील २२ वे मैदान
  लखनऊ येथील मैदानावर पहिला अांतरराष्ट्रीय सामना झाला. टी-२० सामना आयोजित करणारे हे जगातील एकूण १०२ वे अाणि भारतातील २२ वे मैदान ठरले आहे. या मैदानाची एकूण ५० हजार प्रेक्षक अासनक्षमता अाहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे या मैदानाचे नामकरण करण्यात अाले. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी अादित्यनाथ अाणि मान्यवर उपस्थित हाेते.

  राेहित-शिखर धवनची शतकी भागीदारी
  मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला सलामीवीर राेहित व धवनने चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी विंडीजची सुमार गाेलंदाजी फाेडून काढताना पहिल्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी केली. अॅलेनने ही जाेडी फाेडली. त्याने धवनला बाद केले. धवनने ४१ चेंडूंत ४३ धावांची खेळी केली.

  राेहितच्या ८६ सामन्यांत अाता २२०३ धावा
  राेहित शर्माने अाता टी-२० करिअरमध्ये धावांचा माेठा पल्ला गाठला. त्याने विराट काेहलीलाही मागे टाकले. त्याने अाता दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद १११ धावांची खेळी केली. त्याने ६१ चेंडूंत ८ चाैकार व ७ षटकारांसह ही तुफानी खेळी केली. यासह त्याला या फाॅरमॅटमध्ये २२०३ धावांची नाेंद नावे करता अाली. यात ४ शतकांसह १५ अर्धशतकांचा समावेश अाहे.

  पुढील स्लाईडवर पहा, धावफलक आणि संबंधित फोटो...

 • India's third consecutive victory in the third series
 • India's third consecutive victory in the third series

Trending