आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या 19 वर्षांखालील संघाने सातव्यांदा एशिया कप जिंकला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 कोलंबाे - भारताच्या १९ वर्षांखालील टीमने एशिया कप किताब आपल्या नावे केला. टीमने रोमांचक फायनलमध्ये बांगलादेशला ५ धावांनी पराभूत केले. टीमने एकूण सातव्यांदा हा किताब मिळवला. २०१२ मध्ये भारत-पाक संयुक्त विजेता ठरले होते. दुसरीकडे २०१७ मध्ये अफगानिस्तान चॅम्पियन बनला होता. हे स्पर्धेचे आठवे सत्र होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा िनर्णय घेतला. संपूर्ण टीम ३२.४ षटकांत १०६ धावांवर सर्व बाद झाली. एकवेळ संघाने ६२ धावांवर ७ गडी गमावले.  आठव्या स्थानावरील करण लालने ३७ धावा काढत संघाला शंभरी गाठून दिली. ध्रुवने देखील ३३ धावा काढल्या. बांगलादेशकडून मृत्युजॉय चौधरी आणि शमीमने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव ३३ षटकांत १०१ धावांवर ढेपाळला. संघाने ४० धावांवर ६ गडी गमावले होते. त्यानंतर ८ बाद १०१ धावा केल्या. ३३ व्या षटकात डावखुरा फिरकीपटू अथर्वने २ विकेट घेत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. अथर्वने ५ बळी घेत, सामनावीर पुरस्कार मिळवला.