आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा बेराेजगारी दर तीन वर्षांच्या उच्च पातळीवर : सीएमआयई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : भारतात बेराेजगारी दर ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत सर्वांत जास्त आहे. हा आकडा सप्टेंबरपर्यंत ७.२% हाेता. सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकाॅनाॅमी(सीएमआयई)कडून शुक्रवारी जारी डेटानुसार हा आकडा भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीचे संकेत देतात. सीएमआयईच्या अहवालानुसार, याआधी या वर्षी ऑगस्टमध्ये बेराेजगारी दर ८.४ टक्के हाेता. हा सप्टेंबर २०१६ मध्ये बेराेजगारीच्या आकड्यासमान हाेता. अहवालात ऑगस्टच्या साप्ताहिक बेराेजगारी दराच्या आकडेवारीनुसार, महिन्याच्या दर आठवड्यात बेराेजगारी दर ८ ते ९ टक्क्यांदरम्यान राहिला हाेता.

पायाभूत उद्याेगात घसरण :
भारत सरकारकडून गुरुवारी जारी आकडेवारीनुसार, पायाभूत उद्याेगात(काेअर सेक्टर) सप्टेंबरमध्ये ५.२ टक्के घसरण नाेंदली गेली. हे एक वर्षातील सर्वात खराब प्रदर्शन आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये काेअर सेक्टरमध्ये ४.३ टक्के तेजी राहिली हाेती. सरकारी जारी केलेल्या आकड्यांनुसार, गेल्या काही महिन्यांत पायाभूत उद्याेग सर्वात तेजीने काेसळत आहे.

राेजगाराची वाईट बातमी; गेल्या ६ वर्षांत ९० लाख नाेकऱ्या घटल्या
अजीम प्रेमजी विद्यापीठाने राेजगाराबाबत अहवाल प्रकाशित केला आहे. त्यातील माहितीनुसार, गेल्या ६ वर्षांत सुमारे ९० लाख राेजगाराच्या संधीत घट आली आहे. या अहवालानुसार, सन २०११-१२ ते २०१७-१८ दरम्यान राेजगाराच्या संधीत ९० लाखांची घट आली आहे. हा अहवाल लवीश भंडारी आणि अमरेश दुबे यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासाशी मेळ खाणारा नाही. दाेघांनी आर्थिक सल्लागार परिषदेद्वारे पंतप्रधानांना अहवाल साेपवला हाेता. त्यात त्यांनी २०११ मध्ये ४३३ दशलक्ष(४३.३० काेटी) राेजगाराच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये राेजगाराची संख्या वाढून ४५७ दशलक्ष(४५.७० काेटी) वर पाेहाेचली आहे.

बातम्या आणखी आहेत...