आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indifference Of Citizens To Registering Opinions About Delhi; Despite The Target Of 1,33 Lakh People, Only 8,000 Answers

दिल्लीविषयी मते नोंदवण्यास नागरिकांची उदासीनता; १.३३ लाख लोकांचे टार्गेट असूनही फक्त ८ हजार जणांचे उत्तर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतील एका कॅम्पमधील हे छायाचित्र. दंगलप्रभावित भागात मुलांना सुरक्षित स्थळी ठेवले. - Divya Marathi
दिल्लीतील एका कॅम्पमधील हे छायाचित्र. दंगलप्रभावित भागात मुलांना सुरक्षित स्थळी ठेवले.
  • स्मार्ट सिटीसह देशातील ११४ शहरांत शहरी विकास मंत्रालयाचा सर्व्हे
  • दिल्लीत ६ तर बंगालमध्ये फक्त १% लोकांचे मत

प्रवीण धिंग्रा

जोधपूर - देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर राहण्यास किती उत्तम व सुरक्षित आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्यास नागरिकांनी उदासीनता दर्शवली. केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या वतीने १ ते २९ फेब्रुवारी दरम्यान ईझ ऑफ लिव्हिंग यावर सर्व्हे केला होता. यात स्मार्ट सिटीसह देशातील ११४ शहरांची निवड केली होती. येथे राहण्यासाठी, शिक्षण, आरोग्यसेवा, वाहतूक व सर्वसामान्य माणसाची सुरक्षा यासारख्या २१ सुविधांच्या दृष्टीने तुमचे शहर कसे आहे? यावर फक्त ६ टक्के लोकांनी आपले मत नोंदवले. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी १ लाख ३३ हजार २८६ लोकांचे उद्दिष्ट होते. परंतु ७ हजार ९५८ लोकांनी उत्तर दिले. बंगाल:  २८ लोकांचे मत व्यक्
 
प. बंगालच्या हावडा नगर परिषदेतून फक्त २८ लोकांनी सर्व्हेत सहभाग घेतला. येथे ७० हजार लोकांचे उद्दिष्ट होते. हरियाणात निम्म्या लोकांनी आपले मत दिले नाही. येथे ४६ टक्के लोकांचा सहभाग होता. आसाममध्ये ५१% लोकांनी मत दिले. देशातील अन्य राज्यांत १००% लोकांचा सहभाग होता. राजस्थान : ५ शहरांचा समावेश
 
राजस्थानातून या सर्व्हेत ५ शहरांचा समावेश होता. रँकिंगसाठी सर्वात जास्त सहभाग जोधपूर शहरात होता. येथे ११ हजार ५४२ लोकांचे उद्दिष्ट होते. परंतु ३०२% लोकांनी सहभाग घेतला. जयपूर २१४, अजमेर १४७, कोटा १३४ टक्के लोकांनी सर्व्हेत सहभाग घेतला. रँकिंग आधारित योजना

सर्व्हेमध्ये आधाभूत ढांचे, वाहतूक, कायदा व्यवस्था, वाहतूक, वीज, पाणी, शिक्षण, सुरक्षा मनोरंजन यासारख्या पायाभूत सुविधांबाबत विचारणा करण्यात आली. सरकारकडे जितका जास्त फीडबॅक जाईल त्या आधारे शहरांचे रँकिंग ठरणार आहे. त्याआधारे योजना येतील. उत्तरे देण्यात अरुणाचल पहिल्या स्थानी  :


अरुणाचल प्रदेशातील लोकांनी (सुमारे १८००%) सर्वाधिक मते नोंदवली. तर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू होते. येथे ६६७%लाेकांचा सहभाग होता. ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स व म्युनिसिपल परफॉर्मन्स इंडेक्स २०१९ सर्व्हे करण्यात आला होता. याआधारे शहरात जीवन जगण्याच्या सुगमतेचा सूचकांक तयार करण्यात येणार आहे