रंजक तथ्य / निष्काळजीपणा / इंडिगोच्या फ्लाइटने 130 प्रवाशांना तुर्कीला नेले, पण सगळ्यांचे सामान दिल्लीलाच सोडले

इंडिगोची फ्लाइट 6ई-11 रविवारी दिल्लीवरुन तुर्कीची राजधानी इस्तांबुलला पोहचली

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 04:40:00 PM IST

नवी दिल्ली/इस्तांबुल- खासगी एअरलाइन इंडिगोच्या एका चुकीमुळे 130 प्रवाशांना परदेशात जाऊन मोठा त्रास सहन करावा लागला आहे. इंडिगो एअरलाइनची दिल्ली वरुन तुर्कीची राजधानी इस्तांबुलला जाणारी फ्लाइट 6ई-11 रविवारी प्रवाशांना इस्तांबुलला गेली, पण त्यांचे सामान दिल्लीलाच राहीले.

एअरलाइनच्या या चुकीमुळे प्रवासी खूप नाराज झाले. एका प्रवाशाने ट्वीट केले, "इस्तांबुलला गेल्यावर एअरलाइनने प्रवाशांना चिट्‌ठी दिली. त्यात लिहीले होते, 'चुकीने तुमचे सामान दिल्लीतच राहीले आहे. लवकरच तुमचे सामन परत आणले जाईल. तुम्हाला झालेल्या असुविधेबद्दल खेद व्यक्त करतो."


प्रवाशांनी केला गोंधळ
एका प्रवाशाने लिहीले, "सामानात माझ्या वडिलांची औषधी होते. ते डायबिटीजचे रुग्ण आहेत, त्यांना रोज औषध घ्यावे लागते." एअर लाइंसच्या या चुकीमुळे काही प्रवाशांनी गोंधळ केला. काही वेळेनंतर ते सर्व प्रवासी शांत झाले.

X
COMMENT