आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 899 रुपयांत बूक करा विमान तिकिट, देश-विदेशातील 60 शहरांसाठी स्वस्त फ्लाइट खरेदी करण्यासाठी अखेरचे 2 दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडिगो कंपनीने स्वस्त विमान प्रवासासाठी दिवाळी सेल ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल फ्लाइट तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. डोमेस्टीक तिकिटांची सुरुवात 899 रुपये आणि इंटरनॅशनल फ्लाइटच्या तिकिटांची सुरुवात 3399 रुपयांपासून आहे. जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तिकिट बूक करू शकता. 


ऑफरची व्हॅलिडिटी 
इंडिगोच्या या ऑफरचा फायदा 24 ते 26 ऑक्टोबरपर्यंत घेता येईल. 3 दिवसांची ही ऑफर 26 ऑक्टोबरच्या रात्री 11:59PM वाजता संपेल. या ऑफरचा लात्र मिळण्यासाठी तुम्हाला 8 नोव्हेंबर 2018 ते 15 एप्रिल 2019 दरम्यानच्या प्रवासाचेच तिकिट खरेदी करू शकता. यादरम्यान देश-विदेशातील 60 शहरांसह एकूण 10 लाख सीटसाठी तिकिट सेल केले जातील. तुम्ही एका शहराचे तिकिट सिलेक्ट करताच त्यामुळे इतर शहर किंवा विदेशात जाणाऱ्या तिकिटांची पूर्ण याची समोर येईल. 


कंपनीने काय सांगितले 
इंडिगो फ्लाइटचे चीफ कमर्शिअल ऑफिसर विल्यम बॉल्टर म्हणाले की, 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान संपूर्ण नेटवर्कवर फेस्टीव्हल सेलची घोषणा करताना आनंद होत आहे. ग्राहक 899 रुपयांपर्यंतचे स्वस्त तिकिट खरेदी करतील याचा आम्हाला विश्वास आहे. तिकिट कंपनीची वेबसाइट आणि इतर ट्रॅव्हल पोर्ट्ल्सद्वारे बूक करू शकता. 

 

इंडिगोच्या ऑफरसाठीच्या अटी 
> ग्राहकांना ऑफरचा लाभ हा ठरावीक तारीख आणि शहरांसाठीच मिळेल. 
> एअरपोर्ट चार्ज आणि गव्हर्नमेंट टॅक्सवर डिस्काउंट मिळणार नाही, 
> ही ऑफर इंडिगोच्या डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल नेटवर्कच्या विविध भागांच्या नॉन-स्टॉप फ्लाइट्सवरच उपलब्ध असेल. 

 

बातम्या आणखी आहेत...