आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड येथील संविधान महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान
  • तो इतिहास पुन्हा घडल्यास त्याचे श्रेय जेएनयु, हैद्राबाद यूनिवर्सिटीला द्यावे लागेल - जितेंद्र आव्हाड

बीड - इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता असे वादग्रस्त विधान महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. बीडमधील संविधान महासभेत ते बोलत होते. देशात आज ठिकठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. हे सर्व अचानक का होत आहे ? असा सवालही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.  जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलेले आहे.
 

 
राज्यात आणि देशात पुन्हा एकदा तो इतिहास घ
डेल 


जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "'आज देशातील परिस्थिती पाहता, इंदिरा गांधींनी देखील एकेकाळी असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. देशात त्यावेळच्या परिस्थितीबाबत बोलायला कोणीही तयार नव्हते. परंतु अहमदाबाद आणि पटना येथील विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात आवाज उठवला. त्याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास पुन्हा एकदा राज्यात आणि देशात घडेल'' 

...तर जेएनयु हैद्राबाद यूनिवर्सिटी यांना श्रेय द्यावे लागेल़


आज विद्यार्थी भेधडकपणे बाहेर पडत आहेत. लोकांना कायदा समजावून सांगत आहेत. आज जरी त्यांची संख्या कमी असली, तरीही हळूहळू ती वाढेल आणि हेच विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. देशातील आजची परिस्थिती बदलल्यानंतर त्याचे श्रेय जेएनयु, हैद्राबाद यूनिवर्सिटी यांना द्यावे लागेल, असे आव्हाड यावेळी म्हणाले.