इंदिराजींना श्रेय मिळाले, मग मोदींना का नाही : राजनाथ सिंह यांची राष्ट्रवादावर थेट भूमिका

दिव्य मराठी

Apr 22,2019 09:07:00 AM IST

शहडोल/सतना/सीधी - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशात प्रथमच शहडोल, सतना आणि सीधी लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या. त्यात राजनाथ यांनी भाजपवर धर्माच्या नावावर ध्रुवीकरणाच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले की, देशाची हिंदू-मुस्लिमांत विभागणी केली जाऊ शकत नाही. भीती निर्माण करून नव्हे तर लोकांत विश्वास निर्माण करून पाठिंबा मिळवला जाऊ शकतो. मोदी सरकार ‘सबका साथ-सबका विकास’ या उद्दिष्टासह पुढे जात आहे. त्यात न्याय सर्वांना, तुष्टीकरण कोणाचे नाही हा मूलमंत्र आहे.सैन्याच्या शौर्याचे श्रेय घेण्याच्या आरोपांवर राजनाथ म्हणाले की, १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानच्या विभाजनाचे श्रेय घेतले होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी संसदेत त्यांना दुर्गा म्हटले होते. आता मोदींनी पाकिस्तानात घुसून पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला तर ते श्रेय का घेऊ शकत नाहीत?

X