आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाढी अथवा मोठ्या मिशा ठेवणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना व्हायरसचा धोका ४० ते ४९ वयाच्या लोकांना जास्त

अॅटलांटा- जर तुम्ही दाढी अथवा लांब पल्लेदार मिशा ठेवत असाल तर कोरोनाच्या विळख्यात सापडू शकता. हिटलरछाप मिशी ठेवत असाल व गुळगुळीत चेहरा असेल तर कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करू शकाल. अमेरिका सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी (सीडीएस) दाढी-मिशा व त्यासंबंधाने होणाऱ्या कोरोना व्हायरसच्या धोक्याचा अभ्यास केला.


सीडीएसच्या मते, जर तुमच्या चेहऱ्यावर दाढी असेल अथवा मोठ्या मिशा ठेवत असाल तर फेसमास्क उपयोगाचा नाही, परंतु हिटलरप्रमाणे मिशा असतील व गुळगुळीत चेहरा असेल तर फेसमास्क संपूर्ण चेहऱ्याला घट्ट बसेल आणि कोरोना व्हायरसपासूून बचाव करू शकाल.
चेहऱ्यावर केस असल्यास फेसमास्क संक्रमित कण फिल्टर करण्याऐवजी त्यांना खेचून घेतो. चेहऱ्यावर दाट केस नसतील तर फिल्टरचे काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत.


अॅडॉल्फ हिटलरबरोबर सेवा बजावलेल्या एका सैनिकाने म्हटले, दुसऱ्या महायुद्धात ते आपल्या मिशा टूथब्रशच्या आकाराच्या ठेवत.त्यामुळे रेस्पिरेटर लावल्यानंतर  त्यात अडथळा येऊ नये.  दाढी-मिशा असल्या तर मास्क लावल्यानंतरही संक्रमणाचा धोका २० ते १००० पट जास्त असतो. 

वयस्करांना कोरोनाचा धोका

चीनमधील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसचा धोका ४० ते ४९ वयाच्या लोकांना जास्त आहे. ११ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार १४.८% मृत्यू ८० हून अधिक वयांच्या लोकांचे झाले, तर ४०-४९ दरम्यान ०.४ % लोक दगावले