आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indonesia Celebrate New Year With Mass Marriage And No Fireworks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या देशांत नव्या वर्षाचे स्वागत झाले आगळे वेगळे; इंडोनेशियात सुनामीमुळे आतषबाजी नाही, 500 जोडप्यांचा विवाह संपन्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. परंतु इंडोनेशिया मात्र याला अपवाद ठरला. या देशात नुकत्याच आलेल्या सुनामीत 400 हून अधिक लोकांचे बळी गेले. यामुळे या देशात आतषबाजीचे कार्यक्रम रद्द झाले. मात्र, सरकारने देशातील 500 जोडप्यांचा विवाह लावून दिला. यात 21 वर्षांपासून 70 वर्षांच्या जोडप्यांचा समावेश होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुनामीत बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी जमले होते. 

 

चीन : 4000 लोकांनी 10 किमी धावून केले नववर्षाचे स्वागत 
बीजिंग | चीनमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतार्थ 4000 लोकांनी दहा किमी सामूहिक धावण्याची स्पर्धा घेतली होती. निंग्जिया राज्यात झालेल्या या स्पर्धेत 17 वर्षांच्या तरुणापासून 78 वर्षांच्या नागरिकांनी भाग घेतला. 17 वर्षांच्या तियान फेग्जिंयाने स्पर्धेत सहभाग घेतला. 44 मिनिटे 34 सेकंदांत स्पर्धा पूर्ण केली. 

 

ऑस्ट्रेलिया : हार्बर ब्रिजवर नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2018' 
सिडनी | ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बर ब्रिजवर 15 लाखांहून अधिक लोक नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आले होते. जोरदार आतषबाजीही झाली. मोठ्या पडद्यावर एक स्क्रीन दिसत असून यावर नव्या वर्षाचे स्वागत : 2018 यावरून लोकांनी अॉस्ट्रेलियाची खिल्ली उडवली. हे हास्यास्पद आहे., असे लोक म्हणाले.