आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indonesia : Chicks And Plants Are Being Distributed To The Children So That They Leave The Smartphone

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळकरी मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने राबवला अभिनव उपक्रम, पालकांनी देखील व्यक्त केला आनंद 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - इंडोनेशियात पश्चिम जावा भागातील बांडुंग शहरातील स्थानिक प्रशासनाने मुलांना स्मार्टफोन आणि टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी एक अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत मुलांना कोंडीचे पिले, फळ-फुलांची रोपे आणि बियांचे वाटप करण्यात येत आहे. जेणेकरून मुले स्मार्टफोन सोडून त्यांचा सांभाळ करू शकेल. 
स्थानिक प्रशासनाने सांगितले की, शहरातील 10 प्राथमिक शाळ आणि दोन माध्यमिक विद्यालयांत 2000  कोबंडीच्या पिलांचे आणि 1500 मिरचीच्या रोपे उपलब्ध करून दिली आहेत. बांडुंग शहराचे महापौर ओडेम एम यांनी सांगितले की, "इंडोनेशियात इंटरनेट वापरणारे लोक दररोज आठ तास फोनवर असतात. आजकालची मुले देखील इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या व्यसनाचे शिकार होत आहेत. अशात मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्यासाठी हे अभियान यशस्वी ठरले. लवकरच संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवला जाणार आहे." पालक म्हणाले - स्मार्टफोनच्या व्यसनापेक्षा झाडे आणि प्राण्यांची काळजी उत्तम

या उपक्रमाबाबत पालकांनी सांगितले की, "मुलांना शिस्त लावणे चांगली गोष्ट आहे. झाडे आणि प्राण्यांची देखभाल करणे स्मार्टफोनसोबत खेळण्यापेक्षे चांगले आहे." तर दूसरीकडे कोंबडीचे पिले मिळालेल्या मुलांनी सांगितले की, त्यांच्याकडे पक्षी आणि वनस्पती वाचवण्यासाठी त्यांच्याकडे अनेक योजना आहेत.