आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indonesia : Floods Kill 30 People, 65,000 Homeless, 20,000 Travellers Get Stuck, Jakarta Breaks 24 year Record

पुरामुळे 30 जणांचा मृत्यू, 65 हजार नागरिक बेघर, 20 हजार प्रवासी अडकले, जकार्तामध्ये 24 वर्षांचा विक्रम मोडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता : इंडोनेशियात बुधवारी-गुरुवारी पुराने हाहाकार माजवला. सर्वात जास्त परिणाम जकार्तामध्ये झाला. पुरामुळे आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. जकार्तामध्ये २४ तासांत १५ इंच पाऊस झाला. १९९६ नंतर राजधानीत एका दिवसात एवढा पाऊस झाला. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नवीन वर्षात झालेला हा पाऊस सामान्य नाही. गुरुवारपर्यंत जकार्तामधून ६५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तर शेकडो लोक इमारतीच्या छतावर अडकले होते व मदतीच्या प्रतीक्षेत होते. ९५ टक्के घरांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. १७० पेक्षा जास्त भाग पाण्यात बुडाले होते. काही ठिकाणी ८ फुटांपर्यंत पाणी साचले होते. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माहितीनुसार १०० पेक्षा जास्त सदस्य राजधानी जकार्तामध्ये मदत कार्यात आहेत.

भूस्खलन झाल्याने १६ जणांचा मृत्यू

जकार्तालगतच्या बोगोर व दीपोक जिल्ह्यांत पुरामुळे भूस्खलन झाले. यामुळे या भागात १६ जणांचा मृत्यू झाला. हजारो घरे व इमारती बुडाल्याने पाणी व वीज पुरवठा खंडित करण्यात आला. पुरामुळे जकार्तातील विमानतळाचा रनवे बुडाल्याने तो बंद करावा लागला. येथे २० हजारांपेक्षा जास्त प्रवासी अडकले होते.

मदत : १.२ लाख कर्मचारी नेमले, लष्कर पाचारण, ७ जानेवारीपर्यंत देशभरात अलर्ट

इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख अगस विबवो यांच्यानुसार मदतकार्यात १.२ लाख कर्मचारी लावण्यात आले आहेत. लष्करालाही पाचारण करण्यात आले. पाणीपातळी कमी करण्यासाठी मोबाइल वॉटर पंप लावण्यात आले होते. ७ जानेवारीपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

समस्या : पूर-भूकंपामुळे अर्थव्यवस्थेचे दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांचे नुकसान

जकार्ताचा ४०% भाग समुद्राच्या पातळीखाली आहे. यामुळे येथे पूर येतो. जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी काढल्याने भूकंप होऊ लागले आहेत. यामुळे दरवर्षी अर्थव्यवस्थेचे ४५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. यामुळे कालिमंतनला देशाची राजधानी करण्याबाबत सरकार विचार करत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...