आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधूच्या पुरुषी आवाजाने उलगडले भलतेच Secret, दोघांना झाली 13 वर्षांची कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियातील 21 वर्षीय एम फाधोली याने आपल्या 23 वर्षीय गर्लफ्रेंड आयु पुजी अस्तुतिक हिच्याशी विवाह केला. लग्न करून नवीन गावात भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या या नवदांपत्याना संसार अगदी सुरळीतपणे सुरू होता. मात्र, तीन महिन्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यास सुरूवात केली. कारण, होते नववधू आयु हिचा पुरुषी आवाज... अनेक शेजाऱ्यांनी तिच्या मर्दान्या आवाजाबद्दल पती फाधोलीशी चर्चा केली. मात्र, फाधोली अतिशय हुशारीने ती आजारी आहे, किंवा तिचा घसा बसलाय असली कारणे देऊन टाईमपास करत होता. यावर शेजाऱ्यांचा संशय कमी होण्याउलट वाढत गेला आणि त्यांनी याची तक्रार धार्मिक व्यवहार कार्यालयात केली. यानंतर सत्य समोर येताच शेजाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.


समलैंगिक होते कपल, एकाने धरला होता वधूचा वेष
> इंडोनेशियातील ग्लागाहवेरो गावात एक नव-विवाहित दांपत्य भाड्याने घर घेऊन राहायला आले. त्यांनी गावात येताच धार्मिक व्यवहार कार्यालयाचे सदस्यत्व स्वीकारले. तसेच मशीदीकडून होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी व्हायचे... शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर याच धार्मिक व्यवहार कार्यालयाच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, पत्नी आयुने दावा केला, की फाधोलीशी लग्नानंतर तिचे लिंग एका रात्रीत बदलले. अगदी चमत्कारी आणि दैवी शक्तीने ती स्त्री झाली.
> तिने सांगितल्याप्रमाणे, ती रात्री झोपली तेव्हा पुरुष होती आणि सकाळी उठल्यानंतर चमत्कारिकपणे स्त्री झाली. पोलिसांनी या कथानकाला गांभीर्याने घेतले नाही आणि या कपलची आणखी कसून चौकशी केली. यानंतर आयुने आपले खरे नाव सैफुल बाहरी असून तो एक पुरुष असल्याची कबुली दिली. पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबनुसार, हे कपल सैफुलच्या सेक्स चेंज ऑपरेशनसाठी रुगणालयात देखील गेले होते. पण, त्या ऑपरेशनसाठी लागणारा खर्च ऐकूण त्यांना धक्काच बसला. कुठल्याही परिस्थितीत त्यांना हा खर्च परवडणारा नव्हता. 
> सैफुलने सांगितल्याप्रमाणे, तो एक अनाथ आहे. त्यामुळे, लग्न करण्यासाठी त्याने दुसऱ्यांना आपले पालक म्हणून कागदपत्रांवर दाखवले होते. जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश इंडोनेशियात समलैंगिक विवाह निषिद्ध आहे. त्यामुळे, धार्मिक व्यवहार कार्यालय त्यांचा विवाह रद्दबातल ठरवण्यासाठी कोर्टात पुरावे सादर केले. यानंतर कोर्टाने त्यांना समलैंगिक विवाह प्रकरणी आरोपी केले आहे. त्यांना बनावट कागदपत्रांसाठी 6 वर्षे आणि बनावट कबुलीजबाब प्रकरणी 7 वर्षे असा 13 वर्षांचा तुरुंगवास झाला.

बातम्या आणखी आहेत...