Home | International | Other Country | Indonesia: The fate of the opponents after the defeat, 6 deaths

इंडोनेशिया : पराभवानंतर प्रतिस्पर्धी समर्थकांचा उपद्रव, ६ मृत्यू; एक्झिट पोल येताच विरोधी नेत्याने हिंसाचाराची धमकी दिली

वृत्तसंस्था | Update - May 23, 2019, 10:45 AM IST

हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन निकाल आधीच जाहीर

 • Indonesia: The fate of the opponents after the defeat, 6 deaths

  जकार्ता - इंडोनेशियात १७ एप्रिलला झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हिंसाचार भडकला. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती जोको विडोडो यांना विजयी घोषित केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्रीपासून हा हिंसाचार सुरू आहे. बुधवारीदेखील हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यात आतापर्यंत ६ जणांना प्राण गमावावे लागले, तर २०० लोक जखमी झाले. ६० जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराची चिन्हे दिसताच नियोजित निकालाच्या एक दिवस अगोदर निकाल जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत इंडोनेशियन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ स्ट्रगलचे उमेदवार विडोडो यांना ५५ टक्के मते मिळाली. ते दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी जनरल प्रबोवो सुबिएंटो हा निकाल जाहीर होत असताना दहा हजार समर्थकांसह तेथे उपस्थित होते. त्यांनी विडोडो यांच्यावर निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप केला. एवढेच नव्हे, तर हा निकाल मान्य करणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्याच्याविरोधात त्यांनी समर्थकांसह निदर्शनेही केली. सायंकाळ होईपर्यंत निदर्शनांना हिंसक वळण मिळाले. पोलिसांनी गर्दीला हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रबोवो समर्थकांनी हिंसाचार, जाळपोळ केली. त्यांनी विडोडो समर्थकांबरोबरच सुरक्षा दलावरही हल्ले केले. रात्रभर हा उपद्रव सुरू होता.

  > २०० हून जास्त जखमी, हिंसाचार पसरवणाऱ्यांनी ५० हून जास्त वाहने पेटवली दिली.५० हजार जवान तैनात.

  > ६० पेक्षा जास्त लोक अटकेत, अफवा रोखण्यासाठी सोशल मीडिया केला बंद
  > प्रबोवोंचा आरोप : विडोडो निवडणुकीत घोटाळा करून जिंकले, निकालास कोर्टात आव्हान देणार

  एक्झिट पोल येताच विरोधी नेत्याने हिंसाचाराची धमकी दिली

  विडोडो व सुबिएंटो परस्परांचेे कट्टर विरोधक आहेत. सुबिएंटो २०१४ च्या निवडणुकीत विडोडोंकडून पराभूत झाले होते. एक्झिट पोलमध्ये सुबिएंटो पराभूत होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक निकालाच्या दिवशी विडोडो यांच्या विजयाच्या विरोधात १० लाख समर्थकांसह निदर्शने करण्याची धमकीही दिली होती. मंगळवारी, बुधवारी झालेली हिंसा नियोजनबद्धपणे करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

  > अफवा रोखण्यासाठी उपाययोजना, बाजारपेठ, शाळा बंद.
  > इंडोनेशिया तिसरी सर्वात मोठी लोकशाही. येथे राष्ट्रपती, संसद व विधानसभेची निवडणूक एकाच वेळी झाली.
  > १७ एप्रिलला मतपत्रिकेद्वारे मतदान झाले होते. त्यानंतर ३४ दिवस हाताने मतमोजणी चालली होती.
  > इंडोनेशियात मतमाेजणीदरम्यान डिहायड्रेशनमुळे २७० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती.

Trending