आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाटा : दुसऱ्या प्रलयंकारी लाटेने केल्या इमारती उद्ध्वस्त, हॉटेलमधील लोकांसह जंगलात पळाल्यामुळे आम्ही वाचलो...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता- इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सुनामीत २२२ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूला मात देत सुखरूप परतलेले नॉर्वेचे ज्वालामुखीचे छायाचित्रकार ऑएस्टिन अँडर्सन यांनी सांगितलेला अनुभव. त्यांच्याच शब्दांत ...

 

खरे तर ज्वालामुखी शनिवारी सायंकाळपासूनच धगधगत होता. त्यामुळेच मी रात्री जावाचा अंयर किनारा गाठला होता.  मी छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी समुद्रात वेगळ्याच प्रकारची हालचाल झाली. अचानक एक उंच लाट वेगाने आमच्या दिशेने येत होती. मी हैराण झालो. भूकंपाचा धक्का बसलेला नसतानाही एवढी उंच लाट उसळली कशी ? असा प्रश्न मला पडला होता. पण जीव मुठीत घेऊन तेथून पळालो. हॉटेल गाठले. खोलीत पत्नी व मुलगा झाेपलेले होते. त्यांना जागे केले. तोपर्यंत किनाऱ्यावर लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. पळा..पळा..सुनामी आली. सुमारे १०० फूट उंच दुसरी लाट आमच्या दिशेने येत होती. आम्ही हॉटेल कर्मचाऱ्यांसह पळायला लागलो. आम्ही जंगलाच्या दिशेने पळालो. दुसऱ्या लाटेत डझनावर लोक मृत्युमुखी पडले. आम्ही अजूनही डोंगरावर आहोत.’ 

बातम्या आणखी आहेत...