आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगल वाचवण्यासाठी उलट्या पावलांनी ७३० किमीच्या प्रवासावर निघाले इंडोनेशियाचे मेदी बेस्तोनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता   - इंडोनेशियातील ईस्ट जावा येथील डोनो गावापासून देशाची राजधानी जकार्ताचे अंतर ७३० किमी आहे. वाहनाने हा प्रवास करण्यासाठी १० तास लागतात. जर हा प्रवास पायी केला तर यास १५० तास लागतील. पायी प्रवास उलट्या पावलाने करायचा असेल तर... कोणीही म्हणेल, हा वेडेपणा आहे. कारण असा प्रवास करणे अशक्यच वाटते. परंतु उलट पावलाने डाेनो गाव ते जकार्ता असा प्रवास मेदी बेस्तोनी नावाचे गृहस्थ करत आहेत. पण हे कार्य त्यांनी निसर्ग संरक्षणासाठी केले आहे. पर्यावरणतज्ञ मेदी यांनी देशात जंगले नष्ट होत चालली आहेत, या गंभीर समस्येकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उलटपावली चालत जाण्याचा निश्चय केला आहे. 

 

१९७० च्या तुलनेत निम्मी जंगले उरली, ते म्हणतात- हा मुद्दा जागतिक आहे, फक्त इंडोनेशियाचा नव्हे

मेदी यांचा उलटपावली चालण्याचा प्रवास १८ जुलैपासून सुरू झाला. ते घरातून एक बॅग व तीन लाख रुपये घेऊन प्रवासास निघाले. देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १७ ऑगस्ट रोजी ते नॅशनल पॅलेसला जाऊन राष्ट्रपती जोको विदोदो यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, विदोदो यांना माउंट विलिसवर एक रोपटे लावण्यासाठी देणार आहेत. यातून लोकांनाही झाडे लावण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांना वाटते. माउंट विलिस डोंगराच्या आजूबाजूचा परिसर जंगलाला आग लागून नष्ट झाला आहे. यामुळे झाडांची संख्या कमी होत चालली आहे. १९७० च्या तुलनेत इंडोनेशियात जंगलातील झाडांची संख्या आता निम्मी उरली आहे. दरवर्षी कागद, प्लायवूड व पाम ऑइलसाठी लाखो झाडांची कत्तल केली जात आहे. ही समस्या इंडोनेशियाचीच नसून संपूर्ण जगाची आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी आताच निर्णय आवश्यक आहे. 

 

डोडो गावापासून जकार्ता जाण्यासाठी उलट पावलांनी चालण्यासाठी अनोखी पद्धत शोधली आहे. ते जपानी हॅट वापरतात. त्यावर प्लास्टिकच्या पाइपाची मोठी हॅट जोडली आहे. त्यावर एक रिअर व्ह्यूचा अारसा लावला आहे. त्यामुळे मेदींना आजूबाजूच्या सर्व वस्तू, हालचाली दिसतात. प्रवासादरम्यान सुरक्षित राहता यावे म्हणून मेदी मशीद, पोलिस स्थानक अथवा सुरक्षा नाक्यावर मुक्काम करतात. ते म्हणतात, प्रवासात मुक्कामी असताना अनोळखी लोकांची मदत घेेतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या फूड स्टॉल्सवर खातो. हा प्रवास ३० ते ४० दिवसांत पूर्ण होईल. मी १७ ऑगस्ट रोजी जकार्ताला जाईन, असे मेदींनी सांगितले. याआधीही मेदी यांनी २०१६ मध्ये एका पर्यावरणाच्या कार्यक्रमासाठी उलट्या पावलांनी जावा राज्यात भटकंती केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...