आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indore : MBA Student Shubi Jain Volunteering To Manage Traffic On Roads In Indore In Her Unique Way

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डान्स स्टेपने ट्रॅफिक कंट्रोल करते ही मुलगी, व्हिडिओ व्हायरल  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - एमबीएची विद्यार्थीनी शुभी जैन आपल्या अनोख्या अंदाजात ट्रॅफिक कंट्रोल करत असल्यामुळे चर्चेत आहे. शुभी डान्ससोबत ट्रॅफिक कंट्रोल करते. शुभी इंदू पोलिसांसोबत स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. 
23 वर्षीय शुभी जैन पुणे येथील सिम्बायोसिस कॉलजची विद्यार्थीनी आहे. इंदूरमधील रहदारी सुधारण्यासाठी ती इंटर्नशिपवर आली आहे. लाल सिग्नलवर वाहनचालक थांबताच ती त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना वाहतूकीचे नियम समजावून सांगते. दुचाकीवर हेलमेट वापरणाऱ्यांवर ती सॅल्यूट करते. आणि ज्यांनी हेलमेट नाही घातले त्यांना हात जोडून हेलमेट परिधान करण्याची विनंती करते. यासह कार चालकांना सीट बेल्ट लावण्याचा आग्रह करते. 

एडीजींनी केला सन्मान


शुभी जैनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एडीजी वरुण कपूर यांनी तिचा सन्मान केला. शभीने सांगितले की, रहदारी जनजागृती अभियानात सामील होऊन ती केवळ लोकांना जागरूक करत नाही, तर तिचे मित्र आणि परिवाराच्या लोकांना देखील या वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जागरूक करते. 

बातम्या आणखी आहेत...