Home | Business | Industries | industrial-production-mapping-government

औद्योगिक उत्पादन निर्देशांक केंद्राकडून मंजूर

वृत्तसंस्था | Update - May 19, 2011, 05:01 PM IST

केंद्र शासनाने औद्योगिक उत्पादनाचे मापन करणारा निर्देशांक मंजूर केला आहे.

  • industrial-production-mapping-government

    नवी दिल्ली - केंद्र शासनाने आज औद्योगिक उत्पादनाचे मापन करणारा निर्देशांक मंजूर केला आहे. या अंतर्गत आईस्क्रीम, ज्यूस आणि मोबाईल हॅण्डसेटसारख्या 100 नवीन वस्तूंच्या उत्पादन कलावरून या वस्तूंच्या एकूण औद्योगिक उत्पादनाचे आकलन होईल.

    कॉम्प्युटर स्टेशनरी, वर्तमानपत्रे, अमोनिया सल्फेटसारखी रसायने, इलेक्ट्रीक उत्पादने, रत्ने आणि दागिने यासारख्या वस्तूंचा या औद्योगिक निर्देशांकात (आयआयपी) समावेश आहे. निर्देशांकातून काढलेल्या वस्तू टाईपरायटर्स, लाऊड स्पीकर आणि व्हीसीआर यासारख्या सध्या कालबाह्य झालेल्या वस्तूंना निर्देशांकातून काढून टाकण्यात आले आहे. नवीन पायाभूत वर्ष नवीन श्रृंखलेसाठी सन 2004-05 हे पायाभूत वर्ष मानण्यात आले आहे; मागील श्रृंखलेमध्ये 1993-94 हे पायाभूत वर्ष होते. एप्रिल महिन्यातील हा निर्देशांक नवीन मॉडेलवर आधारीत असेल. निर्देशांकाची आकडेवारी 10 जून रोजी जाहीर केली जाईल. औद्योगिक संवर्धन आणि धोरण विभाग (डीआयपीपी) आणि केंद्रीय सांख्यिकी संस्थेने नवीन निर्देशांक बांधणीचे काम पार पाडले आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक दर महिन्याला जाहीर केला जातो. चालु वर्षाच्या औद्योगिक उत्पादनाचा वृद्धी दर 7.8 टक्के राहिला होता.

Trending