आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक लक्ष्मी मित्तल यांचे बंधू प्रमोद यांना युरोपात अटक, 19 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्निया - प्रसिद्ध उद्योजक लक्ष्मी मित्तल यांचे बंधू प्रमोद मित्तल (57) यांना बुधवारी युरोपात अटक करण्यात आली आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 19.32 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. लुकावासच्या एका कोर्टात त्यांना बुधवारीच हजर करण्यात आले. कोकिंग प्लांट जीआयकेआयएलशी संबंधित घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. एक हजार कर्मचारी असलेल्या या प्लांटचे प्रमोद मित्तल 2003 पासून संचालक होते. त्यांनी जीआयकेआयएलच्या सुपरवायजरी बोर्डचे अध्यक्षपद देखील भूषविले. त्यांनी आपल्या वजन आणि प्रभुत्वाचा गैरफायदा घेतला असेही आरोप आहेत.


चौथ्या संशयिताविरुद्ध अटक वॉरंट
कंपनीचे महाव्यवस्थापक परमेश भट्टाचार्य आणि सुपरवायजरी बोर्डाच्या एका सदस्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. बोस्नियातील सरकारी वकील कॅजिम सेरहेटलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास 45 वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते. तिघांना अटक करण्यात आली असून चौथ्या संशयिताविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...