आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Industrialists Like Sanghvi, Anand Mahindra, Birla's Companies Step Back From Digital Payment System

संघवी, आनंद महिंद्रा, बिर्लांसारख्या उद्योगपतींच्या कंपन्यांची डिजिटल पेमेंट सिस्टिममधून माघार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुगल, वॉलमार्टसमोर डिजिटल प्लॅटफॉर्म स्पर्धेत प्रख्यात उद्योगपती मागे
  • मुकेश अंबानी यांची कंपनीही चाचणी करतेय
  • डिजिटल पेमेंटच्या तुलनेत जास्त फंडाच्या कंपन्याच टिकाव धरतील

मुंबई : डिजिटल पेमेंट क्षेत्रात सर्वात जास्त कंपन्या असलेल्या देशाचे नाव घ्यायचे असेल तर भारताचे नाव सर्वात वरती आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात सध्याही ७०% व्यवहार रोखीत होतो. ग्राहक पेमेंटसाठी रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये नव्या प्रकारच्या बँकांची स्थापना केली आणि यामध्ये देशातील दिग्गज उद्योगपतींनी गुंतवणूक केली. मात्र, आता ते आपला हात आखडता घेत आहेत. इंटरनेट मोबाइल आणि ऑनलाइन व्यवहारासाठी त्या वेळी परवाना घेणाऱ्या पाच फर्म्सनी कामकाज बंद केले किंवा त्यांनी गुंतवणूक रोखली आहे. यापैकी तीनला देशातील प्रमुख बिझनेसमेनकडून फंडिंग मिळाली होती. खूप जास्त गुंतवणूक पाहता दिलीप संघवी यांनी आपली पेमेंट बँक सुरू होण्याआधी रोखली आहे. क्रेडिट सुईसच्या अहवालानुसार, २०२३ पर्यंत हा बाजार १ लाख कोटी रुपयांचा होईल. केपीएमजीच्या अहवालानुसार, डिजिटल पेमेंट कंपन्या नफ्यासाठी कमीत कमी तीन वर्षांचा अवधी लागेल. सध्या देशात ९० च्या आसपास कंपन्या यात कार्यरत आहेत. आगामी काळात यापैकी काहीच टिकाव धरण्याचा अंदाज आहे. यावर एफआयएस ग्रुपच्या बँकिंग आणि पेमेंटचे संचालक रामास्वामी वेंकटचलम यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय कंपन्या बंदुकीची लढाई चाकूने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.

नफ्यात येण्यासाठी वित्तीय सेवा द्याव्या लागतील

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि नफ्यासाठी त्यांना अन्य वित्तीय उत्पादनांची सेवा द्यावी लागेल. सध्या बहुतांश कंपन्यांना यात नुकसान सोसावे लागत आहे. ३१ मार्चला जाहीर निकालांत फोन पे आणि अॅमेझॉन पेने एकूण ३ हजार कोटी रु.चे नुकसान दाखवले आहे. असे असले तरी, वर्षभरापूर्वी २०.७ कोटी रुपयांचा तोटा दाखवणाऱ्या पेटीएमने १९कोटी रुपयांचा नफा दाखवला आहे.

गुगलची ब्रँड व्हॅल्यू भारतीय बँकांपेक्षा जास्त

गुगलने व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी परवाना घेण्याऐवजी पारंपरिक कर्जदात्यांसोबत आघाडी करण्याची रणनीती आखली आहे. रिसर्च फर्म फॉरेस्टरनुसार भारतात गुगलची ब्रँड व्हॅल्यू देशातील बँकांपेक्षाही जास्त आहे. आदित्य बिर्ला पेमेंट्स बँक नुकसानीमुळे जुलैमध्ये बंद झाली. टेक महिंद्रा पेमेंट्स बँकेने सुरू करण्याआधीच परवाना सरेंडर केला. मुकेश अंबानींची कंपनीे पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी टेस्टिंग करत आहे. कंपनीला गूगल, वॉलमार्ट आणि फेसबुकशी स्पर्धा करावी लागेल.

रेझर-पेवर ट्रान्झॅक्शनमध्ये गुगलपेची हिस्सेदारी ६१%

बाजारातील संपूर्ण डेटा काढणे कठीण आहे. मात्र, रेझर-पेच्या आकडेवारीनुसर, यूपीआयवर त्याच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात ६१ टक्के हिस्सेदारीसह गुगल पे सर्वात वरती आहे. २४% व्यवहार फोन पेद्वारे झाले, तर पेटीएमद्वारे केवळ ६% व्यवहार झाले. असे असले तरी गुगलने आपल्या इंडिया पेमेंट बिझनेसची विस्तृत माहिती दिली नाही. मात्र, सीईओ सुंदर पिचाईच्या म्हणण्यानुसार, भारत त्यांच्या रणनीतीत महत्त्वाचे स्थान मानतो.