आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष पदाकरीता मदत करणाऱ्या काँग्रेसला झटका...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- यावल पालिकेच्या राजकारणात पुन्हा वातावरण तापले आहे. सत्ताधारी गटातील दोन नगरसेवक अपात्र झाल्यानंतर नगराध्यक्षच्या पात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. निकाल जाहीर होण्याअगोदरच पालिकेचे काँग्रेस नगरसेवक शेख असलम शेख नबी यांच्याविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यावलच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

नगरसेवक पदावर असताना आपल्या पत्नी शाहिस्ता परवीन यांच्या नावावर असलेल्या जागेवर अल्प स्वरूपाची बांधकाम परवानगी घेवून त्यापेक्षा जास्तीचे मोठे बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तर त्यांना अपात्र करण्यात यावे असा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे शशांक देशपांडे यांनी सादर केला असुन दिर्धकाळ राजकारणापासून लांब राहिलेले देशपांडे पुन्हा सक्रीय झाले आह. या अपात्रतेच्या प्रकरणामुळे गुलाबी थंडीत यावल पालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे.

 

तसा तर घरचाच आहेर

पालिकेत शिवसेनेच्या सुरेखा कोळी नगराध्यक्ष असुन उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रा. मुकेश येवले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष पदाकरीता शहरातील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी समर्थन दिले होते तेव्हा एकुणच हा अपात्रतेचा प्रस्ताव घरचा आहेरच म्हणावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...