आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: यूपीत जन्मले 3 लिंग असलेले बाळ, पालक दुखातून सावरलेच होते की डॉक्टरांनी केला आणखी एक खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / लखनौ - जगभरात जन्मणाऱ्या 60 लाख बाळांपैकी फक्त एकाला डिफॅलिया नावाचा जन्मजात आजार होतो. ही अवस्था जितकी दुर्मिळ आहे, तितकीच विचित्र आहे. यात जन्मलेल्या बाळाला एक दोन नव्हे, तर तीन-तीन प्रायव्हेट पार्ट असतात. उत्तर प्रदेशच्या एका शहरात 3 वर्षांपूर्वी असेच एक प्रकरण समोर आले. आई वडील या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतच होते, की त्यांना डॉक्टरांनी दुसरा झटका दिला. या मुलाला पार्श्वभाग सुद्धा नाही असे डॉक्टरांनी सांगितले. अशात या मुलाला मल विसर्जन करता येत नव्हते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटात एक कृत्रिम पाइप बसवला. परंतु, उत्तर प्रदेशात या अवस्थेवर उपचार नसल्याने कित्येक महिने पालकांना मुलासोबत भटकावे लागले. 


मुंबईत झाले यशस्वी उपचार...
उत्तर प्रदेशातील डॉक्टरांनी मल विसर्जनाची समस्या तर दूर केली. परंतु, सर्वात मोठी समस्या अजुनही तशीच होती. पालकांनी विविध डॉक्टरांचा सल्ला घेतला. परंतु, त्यावर उपचार कुणालाच सापडले नाही. मुलगा एका वर्षाचा झाला, तेव्हा अखेर पालकांना नवी उमेद मिळाली. मुंबईतील बोरिवलीत राहणाऱ्या त्यांच्या एका नातेवाइकाने मुलाला आपल्याकडे बोलावून घेतले. यानंतर मुलावर सायन येथील बीएमसी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्या मुलावर शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दोन प्रायव्हेट वेगळे केले. 6 तास चाललेली ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी ठरली. भारतात डिफॅलियावर झालेली ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया मानली जात आहे. 


डॉक्टर काय म्हणाले?
या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे बालरोग तज्ञ आणि सर्जन डॉ. विशेष दीक्षित यांनी सांगितले, की मुलाचे अतिरिक्त प्रायव्हेट पार्ट कापून काढण्यात आले आहेत. त्या मुलाला एकूणच 3 प्रायव्हेट पार्ट होते. अगदी आजू-बाजूलाच असलेल्या अंगापैकी एक फक्त मांसाचा तुकडा होता. तो कापून काढण्यात आला आहे. तर उर्वरीत दोन पार्ट जोडण्यात आले आहेत. आता काही औषधोपचारानंतर तो पूर्णपणे बरा होईल. यानंतरही आई-वडिलांना त्या मुलाच्या भवितव्याची चिंता होती. त्यावर डॉक्टर म्हणाले, की तो मोठा झाल्यानंतर एखाद्या सामान्य पुरुषाप्रमाणे विकसित होईल. तो सामान्यरित्या शारीरिक संबंध सुद्धा प्रस्थापित करू शकेल. एवढेच नव्हे, तर लग्न करून तो बाप देखील होऊ शकतो.

 

बातम्या आणखी आहेत...