सोलापूर / माढ्यात डेग्युंचा शिरकाव, बाप-लेकाला डेग्युसदृश आजाराची लागण; आवश्यक उपाय योजना राबवण्याची गरज 

रुग्णालयातील कर्मचारी शहरातील घरोघरी सर्व्हे करुन नागरिकांना सुचना देणार आहेत - आरोग्य सभापती

Sep 05,2019 02:52:24 PM IST

माढा - माढा शहरातील बाप लेकास डेग्यु सदृश आजाराची लागण झाली आहे. संतोष प्रतापराव साठे (वय 40), सोहम संतोष साठे (वय17) रा.क्रांतीनगर माढा अस डेग्युसदृश लागण झालेल्यांची नावे आहेत.


संतोष साठे व सोहम साठे या दोघांना दि 3 सप्टेंबर रोजी ताप व डोकेदुखी चा त्रास होऊ लागल्याने शहरातील शहा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉ शहा यांना डेंग्यू सदृश आजार असल्याची शंका आली. त्यानुसार डॉ.शहा यांनी दोघांची डेंग्यूची चाचणी केली. त्यामध्ये दोघांना (एन.एस.पॉझिटीव्ह) डेंग्यू सदृश आजार असल्याचे समोर आले. या दोघांना सोलापुरातील यशोधरा रुग्णालयात पाठवले असुन तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील आठवड्यात संतोष साठे यांचा मोठा मुलगा सुरज साठे यास देखील डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली होती. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान माढा ग्रामीण रुग्णालय व माढा नगरपंचायतने डेंग्यूच्या संदर्भात बचावात्मक पावले व उपाय योजना राबवण्याची आवश्यकता आहे.


> संतोष व सोहम हे दोघे ही माझ्याकडे मंगळवारी उपचारासाठी आले होते. मी त्यांची डेंग्यूची चाचणी घेतली. त्यात दोघांचा ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून दोघांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली आहे. शहरवासीयांनी आरोग्याची काळजी घ्यावी. - डॉ विनोद शहा, माढा


> माढा शहरात डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर बिएस सी पावडर फवारणी व धुराडी फिरवली जाईल. माढा ग्रामीण रुग्णालयास देखील पत्र पाठवले असून रुग्णालयातील कर्मचारी शहरातील घरोघरी सर्व्हे करुन नागरिकांना सुचना देणार आहेत. - शिला खरात, आरोग्य सभापती माढा नगरपंचायत

> माढा शहरात दोघांना डेंग्यू सदृश आजार झाल्याची माहिती मला प्राप्त झाली असुन त्यानुसार मी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्याकडून माढा शहरातील नागरिकांचा सर्वे करण्याचे आदेश आल्यावर तातडीने पुढील उपाय योजना राबवल्या जातील - डॉ नंदकुमार घोळवे, वैद्यकिय अधिक्षक माढा ग्रामीण रुग्णालय

X