Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | infertility reasons and remedies

वंध्यत्वामुळे 2.75 कोटी लोक प्रभावित, या छोट्या छोट्या गाेष्टींमुळे होईल फायदा 

दिव्य मराठी | Update - Mar 16, 2019, 12:02 AM IST

जंक फूडमुळे कमरेच्या आजूबाजूला चरबी वाढते. यामुळे ओव्हेल्युशनमध्ये त्रास होतो आणि  पीसीओडीची (पोलिसिस्टिक ओव्हरी डिसीज)

 • infertility reasons and remedies

  इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शनच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये जवळपास २.७५ कोटी जोडपी वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करत आहेत. यातील बहुतांश शहरामध्ये राहणाऱ्या महिलांना बदललेल्या जीवनशैलीमुळे गर्भधारणा होत नाही.


  जंक फूड खाऊ नये
  जंक फूडमुळे कमरेच्या आजूबाजूला चरबी वाढते. यामुळे ओव्हेल्युशनमध्ये त्रास होतो आणि पीसीओडीची (पोलिसिस्टिक ओव्हरी डिसीज) समस्या होऊ शकते. चायनीज फूडमधील सॉसमुळे हार्मोन्सचे प्रमाण वाढतेे आणि जंक फूडमुळे मधुमेहाची शक्यताही बळावते.


  जास्त औषधे घेऊ नयेत
  काही महिलांना छोट्या छोट्या दुखण्यातही औषधे घेत असतात. कित्येकदा या औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. चांगल्या प्रजनन क्षमतेसाठी ही औषधे घेणे टाळले पाहिजे. डॉक्टरच्या सल्ल्यािशवाय कोणतीही औषधे घेणे टाळावे.


  ओवुलेशन पीरियडकडे लक्ष द्या
  प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या ओवुलेशन पीरियडबाबत माहिती हवी, कारण हे साधारणत: १२-१३व्या दिवशी उपलब्ध असते. त्या काळात शारीरिक संबंध असणे गरजेचे आहे.


  धूम्रपान करू नये
  पती किंवा पत्नी धूम्रपान करत असेल अथवा ड्रग्ज, दारू पित असतील तर यामुळे शुक्राणंूची संख्या कमी होऊ लागते. फक्त महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही याचे सेवन करू नये.


  या औषधांचा होईल उपयोग
  फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन 12, सेलेनियम, मल्टी व्हिटॅमीन, फेलेिनयम आणि इतर एलिमंंेट्स या घटकांची भरपूर मात्रा घेतल्यास वंध्यत्वावर परिणाम होत नाही. म्हणून हिरव्या पालभाज्या, सलाड, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खावेत.


  तणावमुक्त राहा
  तणाव नियंत्रित करणाऱ्या कार्टिसोल हॉर्मोनचे प्रमाण नियंत्रणात न राहिल्यास फर्टिलिटी कमी होऊ शकते. म्हणून ऑफिस किंवा घरात तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे गर्भधारणा होण्यास मदत होईल.

Trending